Skin Care : कोरफड Aloe vera या औषधीयुक्त वनस्पतीचे अनेक फायदे आहे. याला इंग्लिशमध्येॲलो (Aloe) म्हणतात. कोरफडचा रस Aloe vera gel हा आरोग्यासाठी लाभदायक आहे. तसेच त्वचेकरीत Skin देखील फायद्याचा आहे. कोरफडीच्या रसामध्ये Aloe vera gel व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, फाॅलिक ॲसिड असे अनेक घटक असतात. तसेच मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्यामुळे शरीराला पोषक घटकांचा पुरवठा करतात. Applying aloe vera gel on the face has tremendous benefits
त्वचा Skin सुंदर आणि निरोगी Healthy राहण्यासाठी कोरफड जेल Aloe vera गुणकारी आहे. कोरफडमध्ये असलेल्या औषधीगुणांमुळे त्वचेला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. कोरफडमध्ये असलेल्या पोशाक घटकांमुळे त्वचे वरील दाग कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यांवरील दाग जाण्याकरीता महिला अनेक स्किन केअर प्रोटक्ट, स्किन ट्रीटमेंचा वापर करता परंतु यामुळे केवळ त्वचा खराब होण्याची भीती जास्त असते.
नैसर्गिकरीत्या तावचेची काळजी घेतल्यास चेहऱ्यावर कोणताच वाईट परिणाम होत नाही. नितळ त्वचा मिळवण्यासाथी कोरफड जेल चा नियमित वापर करावा. रात्री झोपताना कोरफड जेल लावल्यास त्याचे काय फायदे होतात जाणून घेऊया सविस्तर.
हे देखील पहा -
त्वचेवरील डाग कमी होण्यास कोरफड जेलचा उपयोग होतो. अनेकजण महाग प्रोडक्टचा वापर करतात तर काहीजण घरगुती उपाय वापरतात.
कोरफड जेलमुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. सुंदर त्वचेसाठी कोरफड अतिशय उपयुक्त आहे. कोरफड जेल मध्ये 99 टक्के पानी असते. तसेच त्यात असणाऱ्या पोषक घटकांचा त्वचेला भरपूर फायदा होतो. कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, सॅलिसिलिक एसिड, लिग्निन यासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळेच त्वचा चमकदार आणि मऊ होण्यास मदत करते.
रात्री झोपताना चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. फ्रि-रेडिकल्समुळे त्वचेला नुकसहण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री जेल लाऊन झोपल्यास त्वचा सुंदर आणि निरोगी राहते. नियमित कोरफड जेल लावल्यास त्याच सकारात्मक परिणाम दिसतो.
चेहऱ्यावरील मुरूम, काळे दाग कमी करण्यासाठी कोरफड जेल गुणकारी आहे. चमकदार आणि सुंदर त्वचा पाहिजे असेल तर कोरफड जेलचा नियमित वापर करावा. रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल मध्ये काही थेंब गुलाबजल मिक्स करावे. हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावले. 2 ते 4 मिनटे या जेलणे मसाज करावी. सकली उठून चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावे.
असे नियमित केल्याने त्वचा सुंदर यांनी मऊ होते. कोरफड जेल नियमित लावल्याने त्वचेमधील मेलेनिन नावाचा घटक कमी होण्यास मदत होते.
तसेच मृत त्वचा नष्ट होते. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत मिळते .
चेहऱ्यावर जमा होणारी धुळ मुरुमांची समस्या निर्माण करते. परंतु कोरफड जेलचा नियमित वापर केल्याने ही समस्या कमी होण्यास मदत होते.
Edited By - Puja Bonkile
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.