Healthy Drink For High Blood Pressure : कॉफी की, ग्रीन टी? उच्च रक्तदाबासाठी कोणते पेय ठरेल बेस्ट

High Blood Pressure Symptoms : रक्तदाब कमी किंवा झाल्यास वारंवार वाढल्यास हृदयाचे आरोग्य, मज्जातंतूंच्या समस्या वाढतात.
Healthy Drink For High Blood Pressure
Healthy Drink For High Blood PressureSaam tv

Coffee Or Green Tea Which Is Better For high BP: सध्याच्या काळात गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक उच्च रक्तदाबाची समस्या आहे. रक्तदाब कमी किंवा झाल्यास वारंवार वाढल्यास हृदयाचे आरोग्य, मज्जातंतूंच्या समस्या वाढतात.

वजन कमी करण्यासाठी आपण ग्रीन टीचे सेवन अधिक प्रमाणात करतो. तर काही जण दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी कॉफीचे सेवन करतात. हल्ली कॉफी आणि ग्रीन टीचे सेवन करणारे अनेक व्यक्ती आहेत. अनेकदा उच्च रक्तदाबाच्या आजारात आपल्याला खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, जर रक्तदाब 160/100 मिमि एचजी किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्ही कॉफी, ग्रीन टीचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे.

Healthy Drink For High Blood Pressure
Control High Blood Pressure : तुमचंही ब्लडप्रेशर कमी होत नाही? घरगुती उपाय करून पाहा, झटक्यात त्रास छुमंतर

कॅफीनचे सेवन उच्च रक्तदाबासाठी चांगले नाही. यामुळे बीपी अधिक प्रमाणात वाढतो. उच्च रक्तदाबासाठी (Blood Pressure) कॉफी की, ग्रीन टी कोणते पेय बेस्ट ठरेल हे जाणून घेऊया.

1. उच्च रक्तदाब म्हणजे काय?

संशोधनानुसार वयोवृध्द व्यक्तीचा रक्तदाब हा 90/60 mm Hg ते 120/80 mm Hg दरम्यान असावा. अचानक बीपी वाढला तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. संशोधनात असे म्हटले आहे की, जे लोक दररोज फक्त एक कप ग्रीन टी (Green Tea) किंवा कॉफी पितात त्यांना असा धोका नसतो.

Healthy Drink For High Blood Pressure
Most Famous Tourist Place In Nashik : नाशिकमधली ही जागा आहे निसर्गसंपन्न, पावसाळयात हिरव्यागार शालुने बहरतो आसंमत

2. कॉफी की, ग्रीन टी उच्च रक्तदाबासाठी कोणते पेय फायदेशीर?

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कॉफी पिणाऱ्या आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा (Heart Attack) झटका येण्याचा धोका जास्त असतो. पण ज्या लोकांचा बीपी नॉर्मल आहे त्यांच्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही.

अभ्यासात असे आढळून आले की जे लोक दिवसातून एकदा कॉफी पितात आणि दररोज ग्रीन टीचे सेवन करतात, त्यांना हृदयविकाराचा धोका नसतो.19 वर्षे चाललेल्या या अभ्यासाच्या सुरुवातीच्या काळात, 40 ते 79 वर्षे वयोगटातील 6570 पेक्षा जास्त पुरुष आणि 12,000 महिलांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांची कॅन्सरच्या आजारातून जपान कोलॅबोरेटिव्ह कोहॉर्ट स्टडीमधून निवड करण्यात आली होती.

Healthy Drink For High Blood Pressure
South Bombay Famous Place : दक्षिण मुंबईतील झक्कास ठिकाणं...,खाणं-फिरणं सगळं एकाच दिवसात होईल!

3. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी कॉफी पिऊ नका

एक कप कॉफी प्यायल्याने सुमारे 80 ते 90 मिलीग्राम कॅफिन मिळते, उच्च रक्तदाबासाठी हे पेय धोकादायक आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कॉफी न पिणे चांगले आहे कारण यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.

4. बीपीचे रुग्ण ग्रीन टी पिऊ शकतात का?

ग्रीन टीमध्ये कॅफिन आढळते, परंतु याचे प्रमाण खूपच कमी असते, ज्यामुळे हृदय गती आणि चयापचय धोकादायक पातळीपर्यंत वाढत नाही, तरीही ग्रीन टी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com