AMIT SHAH BIG ANNOUNCEMENT saam tv
देश विदेश

२०२९ मध्ये पंतप्रधान कोण? अमित शाहांनी थेट नावाचीच केली घोषणा

Narendra Modi to Become Prime Minister for Fourth Time: २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असे मोठे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.

Omkar Sonawane

गेल्या काही दिवसांपासून भाजप विरुद्ध वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन सुरू असताना सरकार देखील बदलणार असे भाकीत विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. तर मोदी सरकार कोसळणार असे देखील विधान संजय राऊत अनेकवेळा आपल्या पत्रकार परिषदेत करत असतात. 2027 मध्ये उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनऊमध्ये कार्यकारणीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोठं विधान केलं आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

2029 मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. 2014 पासून भाजप सत्तेत आहे. दरम्यान आताच भाजपकडून लोकसभा निवडणुकीची देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी हेच 2029 मध्ये देशाचे चौथ्यांदा पंतप्रधान होतील, अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजप भविष्यात नेतृत्वाची धुरा कोणाकडे असेल? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी केलेल्या विधानाने या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. नरेंद्र मोदी हेच आगामी काळातही भाजपचे नेतृत्व करतील, असा स्पष्ट संदेश शाह यांनी दिला आहे.

तसेच या बैठकीत अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना जमिनीवर उतरून काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. तुम्ही असेच काम करत राहिलात तर ते चौथ्यांदाही पंतप्रधान होतील. उत्तर प्रदेशात भाजपला प्रचंड बहुमताने सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. असा ठाम विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिकेच्या १८ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचा निर्णय; दरवर्षी होणार दोन हजारांची वाढ

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्ग रास्ता रोको आंदोलन...

धक्कादायक! MIM नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी

Diwali Wall Cleaning Tips: दिवाळीत भिंतींना रंग देण्याची गरज नाही! या 5 घरगुती उपायांनी येईल नव्यासारखी चमक

मोठी राजकीय घडामोड! शिवसेना २, भाजपची १ जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT