काहीतरी मोठं घडणार? 12 देशांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा, घरात अन्न-धान्य आणि औषध साठवण्याच्या सूचना; जगात खळबळ

12 Countries Issue Emergency Alerts Ask Citizens To Stock Food And Water: जगातील 12 देशांनी नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरात अन्नधान्य, पाणी आणि औषधांचा साठा ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
12 COUNTRIES ISSUE EMERGENCY ALERTS
12 COUNTRIES ISSUE EMERGENCY ALERTSsaam tv
Published On: 

जगभरातील अनेक विकसिक देशांनी आपल्या नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, जपान, नॉर्वे, फिनलंड, स्वीडन यांसह अनेक देशांनी नागरिकांना घरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती किंवा सायबर हल्ल्यांमुळे वीज, इंटरनेट आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ शकते. अशा वेळी बाहेरील मदतीवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकारांकडून नागरिकांना आधीच तयारी करण्याचे आवाहन केले जात आहे.

12 COUNTRIES ISSUE EMERGENCY ALERTS
Poverty Reduction: भारताने करून दाखवलं! १२ वर्षांत ५० कोटी लोक गरिबीतून बाहेर, वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट

कोणकोणत्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना?

जर्मनी

नॉर्वे

फिनलंड

फ्रान्स

युरोपियन युनियन

स्वित्झर्लंड

आयर्लंड

स्वीडन

चेकिया

लिथुआनिया

ब्रिटन

जपान

या देशांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्वावलंबी राहावे, यासाठी वेगवेगळ्या कालावधीच्या तयारीवरभर दिला जात आहे.

12 COUNTRIES ISSUE EMERGENCY ALERTS
Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर कोसळले; दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू, Video आला समोर

किती दिवसांचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा ठेवण्याचा शिल्लक?

वेगवेगळ्या देशांनी दोन दिवस, तीन दिवस, सात दिवस किंवा दहा दिवसांपर्यंत पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत सरकारी मदत किंवा बाहेरील पुरवठा पोहोचण्यास विलंब झाल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, हा यामागचा उद्देश आहे. अमेरिकेने मात्र आपल्या लष्करी तळांसाठी 90 दिवसांच्या तयारीचे नियोजन केले आहे. मोठ्या युद्धाची किंवा सायबर हल्ल्याची परिस्थिती निर्माण झाल्यास लष्करी तळांना बाहेरील पुरवठ्यावर अवलंबून न राहता काम सुरू ठेवता यावे, यासाठी ही योजना आखली जात आहे.

12 COUNTRIES ISSUE EMERGENCY ALERTS
Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! आता पार्सल थेट घरपोच मिळणार; स्टेशनवर जाण्याची कटकट संपणार

नेमका कशामुळे दिला जातोय हा अलर्ट?

अतिवृष्टी आणि खराब हवामान

पूर आणि नैसर्गिक आपत्ती

वीजपुरवठा खंडित होणे

इंटरनेट आणि दूरसंचार सेवा बंद पडणे

सायबर हल्ले

युद्धजन्य परिस्थिती

वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळे

यापैकी कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी किमान काही दिवस स्वतःच्या गरजा भागवता येतील, इतकी तयारी करून ठेवावी, असा सरकारांचा प्रयत्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.