America Accident Saam Tv News
देश विदेश

America Shocking News : अमेरिकेत फिरायला गेले पण परत आलेच नाही; हैदराबादमधील कुटुंबाचा हृदयद्रावक अंत

America Accident : अमेरिकेत दोन वेगवेगळ्या अपघातांत हैदराबादमधील कुटुंबातील चार सदस्य आणि दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे अमेरिकेतील रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सर्व मृतांचे पार्थिव भारतात आणण्यात आले आहे.

Alisha Khedekar

अमेरिकेत फिरायला गेलेल्या कुटुंबाचा अपघातात अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हैद्राबादमध्ये राहणारे कुटुंब अमेरिकेत फिरायला गेले असता नातेवाईकांना भेटून परत येताना रस्त्यात मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत कुटुंबातील चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

या चौघांना अंतविधीसाठी हैद्राबाद येथे आणण्यात आले आहे. अमेरिकेत एका ट्रकने एका गाडीला धडक दिली. या अपघातात हैदराबादमधील चार जणांचा मृत्यू झाला. झालेल्या अपघातात कुटुंबातील तेजस्विनी, श्री वेंकट आणि त्यांची दोन मुले यांचा मृत्यू झाला आहे. हे संपूर्ण कुटुंब डॅलसमध्ये सुट्टीवर गेले होते.

अटलांटा येथील त्यांच्या नातेवाईकांना भेटून परत येत असताना वाटेत त्यांच्या कारला अपघात झाला. असून या अपघातात ट्रकची धडक इतकी भीषण होती की कुटुंबातील चारही सदस्यांचा कारला लागलेल्या आगीत मृत्यू झाला. दरम्यान अपघातात मृत पावलेल्या कुटुंबाला हैद्राबादमध्ये आणून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशाच एका घटनेत, न्यू यॉर्कमध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात क्लीव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीमधील दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, असे भारतीय वाणिज्य दूतावासाने मंगळवारी सांगितले. पीटीआय वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, २० वर्षीय मानव पटेल आणि २३ वर्षीय सौरव प्रभाकर अशी या विद्यार्थ्यांची ओळख पटली.

लँकेस्टर काउंटी कोरोनर ऑफिसनुसार, १० मे रोजी ईस्ट कोकालिको टाउनशिपमध्ये अपघात झाला तेव्हा प्रभाकर कार चालवत होते. प्रभाकर आणि पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर पुढच्या सीटवर बसलेला आणखी एक प्रवासी जखमी झाला आणि त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करताच डाॅक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान अशा अपघातांमुळे अमेरिकेच्या रस्ते अपघातांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १५ दिवस प्रतिबंधात्मक आदेश; ५ पेक्षा जास्त लोकही जमू शकत नाहीत! नेमकी कशावर घातलीय बंदी?

Accident : महिला मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Ear Wax: कानातला मळ काढण्यासाठी माचिसची काडी वापरताय? आजच सवय सोडा, अन्यथा...

Nutmeg Milk: रात्री झोप येत नसेल तर? दुधात मिसळा स्वयंपाकघरातील हा पदार्थ

Mumbai : ९ जुलैला भारत बंद! मुंबईत शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार? काय सुरु असणार?

SCROLL FOR NEXT