तुम्ही कधी आकाशातून नोटांचा पाऊस पाहिलाय का ? हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. अमेरिकेतल्या डेट्रॉइट शहरात ही घटना घडली आहे. एका हेलिकॉप्टरमधून चक्क नोटांचा पाऊस पाडण्यात आला आणि हे दृश्य पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या अनोख्या घटनामागे आहे ५८ वर्षीय कार वॉश मालक डैरेल थॉमस यांची शेवटची इच्छा. डैरेल यांना हयातीत एकच इच्छा होती मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीतून लोकांवर नोटा उधळाव्यात. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने ही अंतिम इच्छा अगदी तंतोतंत पूर्ण केली आहे.
डैरेल थॉमस यांचा मुलगा एका हेलिकॉप्टरमधून हजारो डॉलर्सच्या नोटा शहरावर उधळताना दिसत आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, अनेकांनी या अनोख्या दानशूरतेचं कौतुक केलं आहे. वडिलांच्या आठवणींना आगळीवेगळी श्रद्धांजली देत मुलाने ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आणि त्याने केवळ आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली नाही, तर गरजूंसाठी एक मदतीचा हातही पुढे केला. ही घटना सध्या अमेरिकेसह जगभर चर्चेचा विषय ठरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.