Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Shocking Video : हॉटेलच्या किचनमधील अन्ननिर्मितीतील बेजबाबदारपणा आणि घाणेरडेपणाचं चित्र उघड झाले आहे. हॉटेलच्या किचनमध्ये खरंच अन्न सुरक्षित असतं का असा सवाल उपस्थित करणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

जर तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवण करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी निश्चितच डोळे उघडणारी ठरू शकते. सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो हॉटेलच्या किचनमधील अन्ननिर्मितीतील बेजबाबदारपणा आणि घाणेरडेपणाचं चित्र उघड करत आहे.या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, किचनमधील एक कर्मचारी जमिनीवर पडलेला कचरा उचलून थेट गॅसवर शिजत असलेल्या अन्नात टाकत आहे. विशेष म्हणजे हे तो एकदाच नाही, तर दोन वेळा करताना दिसतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कृतीबद्दल त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप किंवा भीती दिसत नाही.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाहेर खाण्यापुर्वी अनेकदा विचार करावा लागेल, असे म्हणावे लागेल. सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणारा असा प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.संबंधित हॉटेल आणि दोषी कर्मचार्‍यावर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच, अन्न व औषध प्रशासनाने अशा ठिकाणी नियमित तपासणी करावी, अशीही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com