Iran’s Supreme Leader Ayatollah Khamenei amid rising tensions between Iran and the United States. saamtv
देश विदेश

Donald Trump: मादुरोंनंतर आता अमेरिका खोमेनींचं अपहरण करणार? इराणच्या सर्वोच्च नेत्याला पकडणार?

America Kidnap Iran Supreme Leader Ayatollah Khamenei : अमेरिकन सैन्य इराणवर व्हेनेझुएलासारखा स्ट्राइक करण्याची तयारी करत आहे. निकोलस मादुरोंना जसं त्यांच्या घरात जाऊन ताब्यात घेतलं तसं सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींचं अपहरण करण्याचा प्लॅन आहे. पाहूया एक रिपोर्ट .

Suprim Maskar

  • इराण-अमेरिका तणाव टोकाला

  • सरकारविरोधी आंदोलनात हजारो मृत्यू

  • खोमेनींच्या अपहरणाचा अमेरिकेत कथित प्लॅन

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरीकेत तणाव वाढत आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनात सुमारे 3800 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक मालमत्तेचेही मोठं नुकसान झालं आहे. याच आंदोलना आडून इराणचं सरकार उलथवून टाकण्यासाठी अमेरिका टपून बसला आहे. आता थेट इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींचं अपहरण करण्याचा प्लॅन अमेरीकेमध्ये शिजतोय.

व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांना जसं थेट त्यांच्या घरात जाऊन ताब्यात घेतलं अगदी तशीच रणनिती अमेरीका आखत आहे. म्हणजेच अमेरिकन सैन्य इराणवर व्हेनेझुएला सारखी मर्यादित स्ट्राइक करण्याची तयारी करत आहे. अमेरीकेचे लष्करी मुख्यालय पेंटागॉन आणि व्हाईट हाऊसने खोमेनींच्या अपहरणाची कशी योजना आखली आहे ते पाहूया?

निकोलस मादुरो यांच्याप्रमाणे खोमेनींच्या अपहरणाची ब्लूप्रिंट तयार करण्यात आलीये. अमेरिकन नौदल हळूहळू समुद्रमार्गे इराणकडे येत आहे. 18 दिवसानंतर थेट खोमेनींना लक्ष्य केलं जाईल. अमेरिका त्यांच्या टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी इराणच्या भूमिगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करेल. अमेरिकन विमानवाहू जहाजे अत्यंत प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींनी सुसज्ज आहेत. ही क्षेपणास्त्र रोखणं अशक्य असंत. त्यानंतर अमेरीकेचे डेल्टा फोर्स थेट खोमेनींच्या बंकरमध्ये प्रवेश करेल.

इराणवर थेट हल्ला केल्याने काही साध्य होणार नाही याची जाणीव डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते उलट अमेरीकेच्या हल्ल्यामुळे खोमेनींना देशांतर्गत मोठा पाठिंबा मिळू शकतो. हल्ला झालाच तर तेहरानसह संपूर्ण देशात राष्ट्रवाद पेटू शकतो. इराण समर्थक राष्ट्रही आक्रमक होण्याची शक्यता आहे.

इराणवर थेट हल्ला केल्याने काही साध्य होणार नाही याची जाणीव डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते उलट अमेरीकेच्या हल्ल्यामुळे खोमेनींना देशांतर्गत मोठा पाठिंबा मिळू शकतो. हल्ला झालाच तर तेहरानसह संपूर्ण देशात राष्ट्रवाद पेटू शकतो. इराण समर्थक राष्ट्रही आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत; CM फडणवीसांचं झ्युरिचमध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

आई मला वाचव, श्वास घेता येत नाहीये; कारमध्ये वाढदिवसाची पार्टी करताना अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना साथ साथ? कोल्हापूरात पडद्यामागे काय घडतयं?

बालेकिल्ला शाबूत, राज्यात शिंदेसेनेची पिछेहाट; अकार्यक्षम मंत्र्यांना 'डच्चू' मिळणार?

Bermuda Triangle: वसईजवळील समुद्रात 'बर्म्युडा ट्रॅंगल'? पालघर जिल्ह्याला भूकंपाचा धोका? मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT