A small single-engine aircraft crashed into the sea off Oak Island, North Carolina saam tv
देश विदेश

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Shocking US plane crash off North Carolina : अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये एक छोटे विमान कोसळले आहे. या अपघातातून पायलट बचावलाय.फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने अपघाताची चौकशी सुरू केलीय.

Bharat Jadhav

  • अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या ओक बेटाजवळ २ ऑगस्ट रोजी विमान समुद्रात कोसळलं.

  • अपघातग्रस्त विमान लहान आणि सिंगल-इंजिन प्रकारचं होतं.

  • अपघात संध्याकाळी झाला, तेव्हा किनाऱ्यावर बरीच गर्दी होती.

  • प्रत्यक्षदर्शींनी हा थरारक प्रसंग पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

अमेरिकेत आणखी एक विमान दुर्घटना झालीय. नॉर्थ कॅरोलिनामधील ओक बेटाच्या समुद्रात विमान कोसळलं. विमान अपघात झाला त्यावेळी लोक बेटाच्या किनाऱ्यावर फिरत होते. त्याचवेळी विमान अचानक समुद्रात पडले. हा अपघात शनिवार, २ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी झाला. अपघातग्रस्त विमान एक लहान सिंगल-इंजिन विमान होते.

समुद्रात विमान कोसळल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं. या अपघातात पायलटला किरकोळ दुखापत झाली. जखमी पायलटला किनाऱ्याजवळील रुग्णालयात उपचार करण्यात आले. समुद्रात पडलेल्या विमानाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी इतर जहाजांची मदत घेण्यात आली. अधिकाऱ्यांच्या मते, विमानात पायलट एकमेव व्यक्ती होता. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) या घटनेच्या कारणाचा तपास करत आहे.

विमान जणू काही पाण्यात उतरत असल्यासारखे खाली पडले. या अपघातानंतर समुद्र किनाऱ्यावरील लोकांमध्ये घबराट पसरली, अशी माहिती बेटावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. तांत्रिक बिघाडामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे पायलटला पाण्यात विमान उतरवावे लागले. याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. प्राथमिक चौकशीनंतरच घटनेबद्दल अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

याआधीही अमेरिकेत विमान दुर्घटना झाल्या आहेत. यावर्षी जानेवारीच्या सुरुवातीला, रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळाजवळ अमेरिकन आर्मीचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्सचे प्रादेशिक प्रवासी जेट हवेत धडकले होते. २९ जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात ६७ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये हेलिकॉप्टरमधील तीन क्रू मेंबर्सचा समावेश होता. ३० जानेवारी रोजी अमेरिकेत आणखी एक अपघात घडला, जिथे फिलाडेल्फियामध्ये एअर अॅम्ब्युलन्सला अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

Pune News: पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण; कायद्याचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT