Heavy Rain: हाहाकार! ५० तास संततधार, ४०२ गावं पुराच्या विळख्यात; रस्ते, घाट पाण्याखाली,अस्मानी संकटात १२ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Flood Crisis : मुसळधार पावसानंतर उत्तर प्रदेशला भीषण पुराचा तडाखा बसला. गंगा, यमुना आणि चंबळ सारख्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. १७ जिल्ह्यांमधील ४०० पेक्षा जास्त गावं पाण्याखाली गेली आहेत.
Uttar Pradesh Flood Crisis
Ganga and Yamuna rivers flood over 400 villages in Uttar Pradesh, submerging roads, homes, and ghats
Published On
Summary
  • उत्तर प्रदेशातील १७ जिल्हे पुराच्या विळख्यात; ४०२ गावं पाण्याखाली.

  • गंगा, यमुना आणि चंबळ नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ.

  • प्रयागराज ते बलियापर्यंत गंगा काठावरील संपूर्ण भाग जलमय.

  • पूरामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत.

उत्तर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीय. वाराणसी, प्रयागराज, मिर्झापूर, झाशी, आग्रा, कानपूर देहात, कानपूर नगर यासह सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. घर, घाट,रस्ते सर्व पाण्याखाली गेली आहेत.

गंगा- यमुनेसह चंबल नदीला पूर आलाय. या पुरामुळे सर्व परिसरात भयानक परिस्थीती आहे. उत्तर प्रदेशातील १७ जिल्हे पुराच्या विळख्यात सापडलेत. त्यापैकी १६ जिल्हे गंगा-यमुनेच्या पुरामुळे बाधित झालेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज ते बलियापर्यंत गंगा काठावरील भाग पाण्याखाली गेले आहेत. साधरण ४०२ गावं पुराचा फटका बसलाय. उत्तर प्रदेशचे माहिती संचालक विशाल सिंह यांच्या मते, पावसामुळे राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशात मान्सून ट्रफ रेषा आणि इतर अनुकूल परिस्थितीमुळे, मान्सून सक्रिय आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम विभागात मुसळधार पाऊस सुरूय. रविवारी लखनौमध्ये दिवसभर पाऊस पडला. यामुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, राजधानीतील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व बोर्ड-संचालित शाळांना आज सोमवारी सुट्टी देण्यात आलीय. सुल्तानपूरमध्ये, जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी उपेंद्र गुप्ता यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परिषद आणि बोर्ड शाळांमध्ये सुट्टी जाहीर केली. पाऊस आणि पुरामुळे उत्तर प्रदेशातील २२ जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

गेल्या २४ तासांत, पूर्व उत्तर प्रदेशात १८.४ मिमी पावसाची नोंद झालीय, तर ७.५ मिमी पावसाचा अंदाज होता, जो सामान्यपेक्षा १४६% जास्त आहे. तर पश्चिम उत्तर प्रदेशात ७.२ मिमी पावसाच्या अंदाजाऐवजी ८.२ मिमी पावसाची नोंद झालीय. जे सामान्यपेक्षा १४% जास्त आहे. हवामान खात्याने सोमवारी उत्तर प्रदेशातील ६० हून अधिक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीय.

प्रयागराज शहरातील सालोरी, राजापूर, दारागंज, बघाडा हे भाग पाण्याखाली गेलेत. मिर्झापूर, वाराणसी, चंदौली, बलिया येथेही वाईट परिस्थिती आहे. प्रयागराजला सर्वाधिक फटका बसलाय. ईशान्य-आग्नेय-पूर्व-पश्चिमेकडून संपूर्ण संगम क्षेत्र एका विशाल समुद्रासारखे दिसू लागलाय. प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेच्या संगमानंतर येणाऱ्या भागांमधील परिस्थिती अधिक वाईट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com