3 Police Officers Killed Saam
देश विदेश

चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

3 Police Officers Killed: हल्लेखोराचा पोलिसांवर हल्ला. ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, २ गंभीर जखमी. हल्लेखोराला ठार मारलं.

Bhagyashree Kamble

  • पेनसिल्व्हेनियात गोळीबारात ३ पोलीस अधिकारी ठार, २ गंभीर जखमी झाले.

  • आरोपीने दबा धरून बसल्यानंतर पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला.

  • हल्लेखोराला पोलिसांनी ठार केले असून तपास सुरू आहे.

  • गव्हर्नर जोश शापिरो आणि पोलीस आयुक्तांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला.

अमेरिकेतील दक्षिण पेनसिल्व्हेनियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन पोलीस अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. तर, इतर दोघे जखमी झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला ठार मारले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

नक्की काय घडलं?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचा फौजफाटा आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी हल्लखोर दबा धरून बसला होता. त्यावेळेस आरोपींनं अंदाधुंद गोळीबार केली. या हल्ल्यात ५ पोलीस कर्मचाऱ्यांना गोळी लागली. त्यातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

सीएनएन वेबसाईटनुसार, ही भयंकर घटना नॉर्थ कोडोरस टाऊनशिप परिसरात घडली आहे. आरोपीला ताब्यात घेत असताना हा हल्ला झाला. पेनसिल्व्हेनियाचे गर्वनर जोश शापिरो यांनी या घटनेबाबात सांगितले की, 'या देशाची सेवा करणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो'.

'या प्रकाराची हिंसाचार योग्य नाही. या प्रकरणाची पूर्ण, निष्पक्ष चौकशी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही', असे पेनसिल्व्हेनियाचे पोलीस आयुक्त क्रिस्टोफर पॅरिस म्हणाले. यॉर्क हॉस्पिटलने दोन गंभीर जखमींवर उपचार सुरू केले आहेत. सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे. अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

फेब्रुवारी महिन्यांतही याच भागांत गोळीबाराची घटना घडली होती. पिस्तूल घेऊन एक व्यक्ती रूग्णलयाच्या अतिदक्षता विभागात गेला होता. गोळीबार करण्यापू्र्वी आरोपीनं कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं होतं. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Maharashtra Live News Update: एमएससीबीच्या वायरमेनच काम करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले

म्हाडाकडून बंपर लॉटरी; पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर, आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT