आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

Uttarakhand Cloudburst: देहरादूनमध्ये ढगफुटीसदृश्य पावसामुळे २२ लोकांचा मृत्यू झाला असून १५ जण बेपत्ता आहेत.एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम बचावकार्य करत आहेत.
Uttarakhand Cloudburst
Uttarakhand CloudburstSaam
Published On
Summary
  • देहरादूनमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे २२ जणांचा मृत्यू तर १५ जण बेपत्ता आहेत.

  • एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमकडून सहस्त्रधारा आणि इतर भागात बचावकार्य सुरू आहे.

  • ६२ रस्ते आणि ८ पूल पावसामुळे कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

  • प्रशासनाने मृत व बेपत्ता लोकांची यादी जाहीर केली असून, शोधमोहीम अद्याप सुरू आहे.

उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. ढगफुटीसदृश्य पावसामुळे परिसरात हाहाकार माजला आहे. देहरादूनमध्ये २४ तासांनंतर एकूण सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मृतांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. १५ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफने सहस्त्रधारा परिसरात बचावकार्य सुरू आहे. परंतु, ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही.

१५ आणि १६ सप्टेंबर रोजी देहरादूनमध्ये मुसळधार पाऊस पडला होता. नद्या ओढ्यांना आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मंगळवारी प्रशासनाने १३ जणांचा मृ्त्यू तर, १६ जण बेपत्ता असल्याची माहिती दिली. बुधवारी प्रशालनाने मृत आणि बेपत्ता लोकांची यादी जाहीर केली. या यादीतून १८ जणांचा मृत्यू तर, १५ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

Uttarakhand Cloudburst
'माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतो?' बॉयफ्रेंडकडून त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार, पुण्यासारखा नवी मुंबईत रक्तरंजित थरार

१६ सप्टेंबर रोजी १३ जणांचे मृतदेह सापडले. विकासनगरमधील रहिवासी दोन महिला आणि एका तरूणाचे मृतदेह सहारनपुरात सापडले. तर, बुधवारी शिमला बायपास परिसरात एका तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला. तर, रायपूर परिसरातील सौंग नदीत २ तरूणांचे मृतदेह आढळले. मात्र, दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Uttarakhand Cloudburst
शाळेसमोर भीषण अपघात, पोलिसाच्या कारने ३ विद्यार्थ्यांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

ढगफुटी सदृश्य पावसामुळे देहरादूनमध्ये ६२ रस्ते आणि एकूण आठ पूल खराब झाल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतपाल महाराज म्हणाले की, यापैकी ३५ रस्ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. २७ रस्ते पुन्हा सुरू करण्याचे काम चालू आहे. तर, मालदेवतापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलेत गावात बुधवारी सकाळी बचावकार्य सुरू झाले. तर, रस्ते बांधकाम करणारे कर्मचारी अद्याप सापडलेले नाहीत. त्यांचा शोध सुरू आहे.

Uttarakhand Cloudburst
सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील शिंदेंना कोर्टात चक्कर, रूग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन, पुण्यात अंत्यसंस्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com