सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील शिंदेंना कोर्टात चक्कर, रूग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन, पुण्यात अंत्यसंस्कार

Siddharth Shinde Dies of Heart Attack: सिद्धार्थ शिंदे हे सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Supreme Court Senior Lawyer Siddharth Shinde
Supreme Court Senior Lawyer Siddharth ShindeSaam
Published On

दिल्लीहून एक दुख:द बातमी समोर येत आहे. सुप्रिम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, काल त्यांची ४९व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर कायदा क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आज त्यांचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणले जाईल, तसेच अंत्यसंस्कार केले जाईल.

सिद्धार्थ शिंदे यांना सोमवारी न्यायालयात अचानक भोवळ आली. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रूग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या निधनानंतर शिंदे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

Supreme Court Senior Lawyer Siddharth Shinde
फिनिक्स मॉलमध्ये भयंकर घडलं; IT कर्मचाऱ्याकडून सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी, बलात्काराचा प्रयत्न

सिद्धार्थ शिंदे या माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू होते. राज्यात शिंदेंची वेगळीच ओळख होती. ते फक्त वकील नसून, कायद्याचे विश्लेषणसुद्धा ते सोप्या भाषेत सामान्यांना समाजावून सांगायचे. शिंदे एक मार्गदर्शक देखील होते.

Supreme Court Senior Lawyer Siddharth Shinde
गोविंद बर्गे अन् पूजाचे Whatsapp चॅट्स समोर, पोलिसांना मिळाला धमकी दिल्याचा पुरावा

मराठा आरक्षण असो किंवा राज्यातील सत्तासंघर्ष, यांसारख्या महत्वाच्या सुनावण्यांवेळी त्यांनी सुप्रिम कोर्टातील युक्तिवाद आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या अकाली निधनानंतर कायद्याच्या क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Supreme Court Senior Lawyer Siddharth Shinde
आईनं अभ्यास कर म्हटल्याचा राग; नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com