गोविंद बर्गे अन् पूजाचे Whatsapp चॅट्स समोर, पोलिसांना मिळाला धमकी दिल्याचा पुरावा

Govind Barge and Pooja Gaikwad Case Twist: पोलिसांच्या हाती आलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये गोविंद बर्गे यांनी पूजाला आत्महत्येची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. तसेच बँक व्यवहार आणि महागड्या भेटवस्तूंची माहिती मिळाली आहे.
govind barge pooja gaikwad
govind barge pooja gaikwadx
Published On
Summary
  • बीड उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड अटकेत आहे.

  • पोलिसांनी कोर्टात व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल डिटेल्स सादर केले.

  • गोविंद यांनी पूजाला आत्महत्येची धमकी दिल्याचं चॅट्समधून समोर आलं.

  • पूजाला बार्शी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बीडच्या लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. सध्या पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. पोलिसांनी कॉल लॉग आणि बँक डिटेल्स जप्त केले आहेत. आता पोलिसांच्या हाती व्हॉट्सअॅप चॅट्स आले आहेत. या चॅट्समधून गोविंद यांनी पूजाला आत्महत्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी पूजाची पोलीस कोठडी संपली. तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल डिटेल्स कोर्टात सादर केले. व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा आणि गोविंद बीडमधील विवध ठिकाणी लॉजवर भेटायचे. धक्कादायक म्हणजे व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये गोविंद याने पूजाला आत्महत्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

govind barge pooja gaikwad
आईनं अभ्यास कर म्हटल्याचा राग; नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

प्रेमसंबंधात गोविंद याने पूजावर महागड्या वस्तूंची उधळण केली होती. तिला सोन्या चांदीचे दागिने, महागडा मोबाईल तसेच ७ लाखांचा प्लॉट विकत घेऊन दिला होता. दोघांच्या बँक खात्याचीही तपासणी करण्यात आली. दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाले. पोलिसांनी या प्रकरणी अनेकांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी पूजाच्या मैत्रिणीचाही जबाब नोंदवून घेतला आहे.

govind barge pooja gaikwad
पुण्यात भाजपने गेम फिरवला, अजित पवारांना जोरदार धक्का; राष्ट्रवादीच्या ३४ नेत्यांनी कमळ हाती घेतलं

पूजा गायकवाडला जामिन मिळणार?

एकूण सात दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर बार्शी न्यायालयाने पूजाला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. आता पूजा गायकवाड जामिनासाठी अर्ज करू शकते. सध्या पूजाची सोलापुरातील महिला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

govind barge pooja gaikwad
प्रायव्हेट पार्टवर २३ ठिकाणी स्टेपलर मारले, नंतर पेपर स्प्रे मारत...; कपलचे २ तरुणांसोबत भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com