पुण्यात भाजपने गेम फिरवला, अजित पवारांना जोरदार धक्का; राष्ट्रवादीच्या ३४ नेत्यांनी कमळ हाती घेतलं

BJP Strengthens Base in Pune: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. एकूण ३४ जणांनी भाजपात प्रवेश केला आहे.
BJP Strengthens Base in Pune
BJP Strengthens Base in PuneSaam
Published On
Summary
  • पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला.

  • एकूण ३४ जणांनी भाजपात प्रवेश करत पक्षाची ताकद वाढवली.

  • माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष यांसारखे महत्त्वाचे चेहरे सहभागी.

  • आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजप अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा.

गणेश कवडे, साम टिव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी राज्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. प्रत्येक नेत्यानं मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. नुकतेच जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे. याच दरम्यान पुण्यात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटाला भाजपने धक्का दिला असून, एकूण ३४ जणांनी भाजपात प्रवेश केला आहे.

पुण्यात भाजप पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना धक्का दिला असून, यामुळे पुण्यात भाजपची ताकद वाढली आहे. मुंबईत पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडल्याची माहिती आहे.

BJP Strengthens Base in Pune
डोक्यात मोठा दगड पडला, जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला; माळशेज घाटात तरूणाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील बडे चेहरे भाजपच्या गळाला लागले आहेत. माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्षांसह अनेकांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मावळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसह खरेदी विक्री संघातील संचालकांनी भाजपात प्रवेश केला आहे.

BJP Strengthens Base in Pune
मुंबईकरांचे मेगाहाल! पश्चिम, मध्य अन् हार्बर लोकलला लेटमार्क, रस्त्यावरही वाहतूककोंडी, मोनो रेल विस्कळीत

पुणे जिल्हा परिषद, लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सभापतींनीही भाजपात पक्षप्रवेश केला आहे. देहू नगरपालिकेतील नगरसेवकांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. यासह पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षही भाजपात प्रवेश करणार आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची ताकद वाढली असल्याची चर्चा आहे.

BJP Strengthens Base in Pune
वक्फ कायदा कायम, ३ सदस्य राहणार बिगर मुस्लिम, पण ५ वर्षांच्या 'त्या' अटीवर SC चा मोठा निर्णय

मावळमध्ये भाजप - अजित पवार गटात रस्सीखेच

तर, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मावळमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला भाजपनं जोरदार धक्का दिला आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळकेंची साथ सोडून बडे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शेळकेंचे पदाधिकारी माजी आमदार बाळा भेगडेंच्या गळाला लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com