
केरळमध्ये जोडप्यानं दोन तरुणांवर अमानुष अत्याचार केला.
लोखंडी रॉड, मिरची स्प्रे आणि स्टेपलरने हल्ला करून लूटमार केली.
व्हॉट्सअॅप चॅट्समुळे आरोपी जयेश संतापला आणि पत्नीला कटात सामील केलं.
पोलिसांनी जयेश आणि रश्मीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवलं.
केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका जोडप्यानं भयानक कृत्य केलं आहे. जोडप्यानं दोन पुरूषांना त्यांच्या घरी बोलावून घेतलं. नंतर त्यांच्यावर मिरचीचा स्प्रे मारला. मारहाण करत दोघांच्याही गुप्तांगावर वार केले. तसेच दोघांकडून महागड्या वस्तू हिस्कावून घेतल्या. तसेच दोघांना निर्जनस्थळी सोडून दिले. या प्रकऱणी पोलिसांना आरोपीला अटक केली असून, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जयेश आणि त्याची पत्नी रश्मी असे आरोपींचे नावे आहेत. ही धक्कादायक घटना १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर रोजी घडली आहे. या जोडप्यानं आधी १ सप्टेंबर रोजी अलप्पुझातील नीलमपेरूर येथील तरूणाला घरी बोलावून घेतलं. नंतर ५ सप्टेंबर रोजी पथनमथिट्टातील रन्नी येथील दुसऱ्या व्यक्तीला घरी बोलावून घेतलं.
सुरूवातीला त्यांनी १९ वर्षीय नीलमपेरूर तरूणाला बांधून ठेवलं. नंतर त्याच्यावर लोखंडी रॉडने वार केले. नंतर सायकलच्या चैनने वार केले. जोडप्यानं त्याच्या प्रायव्हेट पार्टवर पेपर स्प्रे फवारला. तसेच वॉलेटमधून १९ हजार रूपये चोरले. त्यांनी नंतर पीडित व्यक्ती ऑटो स्टँडजवळ सोडले. त्यांनी कुणालाही न सांगण्याची धमकीही दिली.
५ सप्टेंबर रोजी देखील जयेश या तरूणासोबत अमानुष कृत्य केलं. सुरूवातीला त्याचा लोखंडी रॉडनं मारहाण केली. नंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर २३ ठिकाणी स्टेपलर मारल्या. तसेच त्याचे पैसे आणि मोबाईल चोरला. नंतर त्या तरूणाला निर्जनस्थळी सोडून दिलं.
दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांना धक्का बसला. असे कृत्य करण्यामागे पोलिसांनी हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपी रेश्मीनं दोन्ही पीडित तरूणांसोबत संबंध ठेवले होते. जयेशला व्हॉट्सअॅप चॅट्सबद्दल कळताच त्याला संताप अनावर झाला. त्यानं बदला घेण्यााचे ठरवले. तसेच रेश्मीला प्लॅनमध्ये सामील करून घेतलं'.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करीत जयेश आणि रेश्मीला ताब्यात घेतलं आहे. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.