मंदिरात लग्न, नंतर गर्भपात अन् तोंडातून फेस येत मृत्यू; ज्युनियर डॉक्टरनं MBBS विद्यार्थिनीचा घात केला?

Junior Doctor in Police Custody: एका ज्युनियर डॉक्टरच्या २४ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनी पत्नीचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ज्युनिअर डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे.
Junior Doctor in Police Custody
Junior Doctor in Police CustodySaam
Published On
Summary
  • मालदामध्ये एमबीबीएस विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू.

  • ज्युनियर डॉक्टर पती उज्ज्वल सोरेनला पोलिसांनी अटक केली.

  • मृत्यूचं कारण ड्रग्ज ओव्हरडोज असल्याचा संशय.

  • पीडितेच्या आईनं गंभीर आरोप करून न्यायाची मागणी केली.

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.सरकारी मालदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील एका ज्युनियर डॉक्टरला त्याच्या २४ वर्षीय पत्नीचा (MBBS विद्यार्थीनी) गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर अटक करण्याात आली आहे. मृत तरूणीच्या कुटुंबियांनी डॉक्टरवर गंभीर आरोप केले असून, पोलिसांनी तपासानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

उज्ज्वल सोरेन असे ज्युनियर डॉक्टर, संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला मालदा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, असे पोलीस सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, उज्ज्वल सोरेन हा मूळचा बंगालमधील पुरूलिया जिल्ह्यातील रहिवासी आहे.

Junior Doctor in Police Custody
Pune: घर ते मेट्रो स्थानक प्रवास होणार मोफत; शटल बससेवा सुरू, थांबे अन् कोणत्या वेळेत धावणार?

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्याच्या फोन लोकेशनवरून त्याचा शोध घेण्यात आला. सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. सरकारी मालदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील ज्युनिअर डॉक्टर यांचे एमबीबीएस विद्यार्थिनीसोबत प्रेमसंबंध जुळले.

Junior Doctor in Police Custody
डोक्यात मोठा दगड पडला, जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला; माळशेज घाटात तरूणाचा मृत्यू

मृत तरूणीच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार, रिलेशनमध्ये तरूणी ज्युनियर डॉक्टरकडून गर्भवती राहिली होती. एक वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर गर्भपात झाला. पीडित तरूणी आणि उज्ज्वलने मंदिरात जाऊन लग्न केले होते. परंतु तरूणीनं कोर्ट मॅरेजचा आग्रह धरला. तेव्हा उज्ज्वलने तिच्या आग्रहाला कानाडोळा केला.

प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, एमबीबीएस विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण ड्रग्ज ओव्हरडोज असू शकते. पोलीस पीडित तरूणीच्या शवविच्छेदनाच्या अहवालासाठी थांबले आहेत. यानंतर या अहवालातून पुढील तपास केला जाईल.

Junior Doctor in Police Custody
बाहेर कॉम्प्यूटर सेंटरचं पोस्टर, आत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी तरूणींना रंगेहाथ पकडलं

मृत पीडितेच्या आईनं उज्ज्वलवर गंभीर आरोप केले आहेत. 'गेल्या सोमवारी माझी मुलगी माहेरी आली होती. सोरेननं तिला भेटायला बोलावले. कदाचित त्यांच्यात भांडण झाले असावे. कदाचित तिला मारहाण करण्यात आली असावी. तिनं काहीतरी खाल्लेही असावे. त्यानंतर मुलीची प्रकृती गंभीर झाली. तिच्या तोंडातून फेस येत होता. रात्री तिचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला', असं पीडितेच्या आईनं म्हटलं आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com