Hospital Saam tv
देश विदेश

America News: देवमाणसं! मरणासन्न अवस्थेतील महिलेचा डॉक्टरांनी वाचवला जीव, डुकराच्या किडनीचं केलं प्रत्यारोपण

America New Jersey News: अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. न्यू जर्सीमध्ये रुग्णालयात एका महिलेच्या शरीरात डुक्कराची किडनी प्रत्यारोपित करुन तिचे प्राण वाचवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. न्यू जर्सीमध्ये एका रुग्णालयात महिलेच्या शरीरात डुक्कराची किडनी प्रत्यारोपित करुन तिचे प्राण वाचवले आहे. या महिलेचे हृदय आणि मुत्रपिंडाने काम करणे जवळपास बंद केले होते. यावेळी ती महिला वाचण्याची खूप कमी शक्यता होती. मात्र, डॉक्टरांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने या महिलेचे प्राण वाचवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एका हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. डॉक्टरांनी महिलेला डुक्कराची किडनी प्रत्यारोपित करुन तिच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरु केले आहेत. लिसा पिसानो असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे हृदय आणि मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने अवयव प्रत्यारोपण करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी यांत्रिक पद्धतीचा वापर केला आहे.

महिलेचा जीव वाचवण्यासाठी ही पद्धत वापरण्यात आली

एनवाययू लँगोन हेल्थ इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी ही नवीन पद्धत शोधून काढली आहे. ज्यात महिलेचे प्राण वाचवण्यासाठी एक यांत्रिक पंप बसवण्यात आला. काही दिवसांनी डुक्कराची किडनी प्रत्यारोपित करण्यात आली. मागील महिन्यात मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी बुधवारी सांगितले. पिसानो ही जगातील दुसरी महिला आहे जिच्या शरीरात डुक्कराची किडनी प्रत्यारोपित करण्यात आली आहे.

याआधी मार्चमध्ये पहिल्यांदा डुक्कराची किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये एका ६२ वर्षीय व्यक्तीच्या शरीरात डुक्कराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीनंतर सोन्याचे भाव वधारले; चांदीचा दर जैसे थे, आठवड्याच्या शेवटी सोनं कितीनं महागलं?

Maharashtra Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत; 'धनुष्यबाण' घेणार हाती

Crime News: संतापजनक! मुलीने प्रपोज नाकारल्याने हॉटेल मालक संतापला, रिसेप्शनिस्टवर केला बलात्कार

Box Office Collection : 'थामा'च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण; 'एक दीवाने की दीवानियत'नं किती कमावले? वाचा कलेक्शन

हातपाय बांधले अन् गरम चटके; अनैतिक संबंधातून नांदेडच्या तरूणाची कर्नाटकात हत्या

SCROLL FOR NEXT