Rahul Gandhi-Priyanka Gandhi: अमेठीतून पुन्हा राहुल गांधी तर रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार? काँग्रेसचा मास्टर प्लान

Rahul Gandhi-Priyanka Gandhi News: राहुल गांधी आता वायनाड लोकसभा मतदारसंघासहित दुसऱ्या मतदारसंघातही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Rahul Gandhi-Priyanka Gandhi
Rahul Gandhi-Priyanka GandhiSaam Tv
Published On

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. देशात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी प्रचारसभांचे आयोजन केले जात आहे. काँग्रेसचे राहुल गांधी हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत. मात्र, राहुल गांधी आता वायनाड लोकसभा मतदारसंघासहित दुसऱ्या मतदारसंघातही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेससाठी उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि अमेठी या दोन्ही जागा खूप महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही जागांसाठी उद्या म्हणजेच २६ एप्रिलला अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान राहुल गांधी हे अमेठीतून तर प्रियांका गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या जागांवर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी अयोध्येला जाऊन रामललल्लाचे दर्शन घेऊ शकतात, असेही सांगितले जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे या दोन जागांवर निवडणूक लढवू शकतात. या दोन्ही जागांच्या उमेदवारांची औपचारिक घोषणा ३० एप्रिलपूर्वी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियांका यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत काँग्रेस नेत्यांनीही काहीच सांगितले नाही. अमेठी आणि रायबरेलीला जाण्याआधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी अयोध्येला जाऊन रामल्लांचे दर्शन घेतील, असे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आले नाही.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने याबाबत संकेत दिले आहेत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर ते १ मे किंवा ३ मे रोजी उमेदवारी अर्ज भरतील,असे त्यांनी सांगितले.

अमेठीतून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधी तयार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी राहुल गांधी यांच्या टीमने अमेठीत तळ ठोकला आहे. राहुल गांधीच्या उमेदवारीसाठी यूपी काँग्रेसच्या टीमला १ मे ही तात्पुरती तारीख देण्यात आली आहे. काँग्रेस १ मे रोजी अमेठीत आपली ताकद दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिलच्या मतदानानंतर राहुल गांधी २७ एप्रिलला अमेठीत पोहचण्याची शक्यता आहे. ते १ रोजी अर्ज दाखल करु शकतात. राहुल गांधी अमेठीतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या रायबरेलीतून अनेकदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

Rahul Gandhi-Priyanka Gandhi
Rajasthan News: तो पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांनीच दिला... फोन टॅपिंग प्रकरणात अशोक गेहलोत यांच्या माजी OSDचा गंभीर आरोप

२०१९ च्या निवडणूकीत राहुल गांधीचा पराभव

२०१९ च्या निवडणूकीत राहुल गांधीचा अमेठीतून पराभव झाला होता. मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या ५ जागा आहेत. २०२२ च्या निवडणूकीत समाजवादी पक्षाला दोन जागा तर भाजपाला ३ जागा मिळवण्यात यश आले होते.

Rahul Gandhi-Priyanka Gandhi
Lok Sabha Election:'...तर कमीत कमी माझ्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहा'; मल्लिकार्जुन खर्गेंचं जनतेला भावनिक आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com