pakistan vs afganistan news Saam tv
देश विदेश

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं; दोन्ही देशांच्या वादात अमेरिकेची उडी, वाचा खास रिपोर्ट

pakistan vs afganistan news : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध सुरू झालंय. पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानच्या काबूल, कंधार आणि पक्तिया या भागात एअरस्ट्राईक केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून तालिबानेही आक्रमक उत्तर दिलय..आता या युद्धात अमेरिकेनंही उडी घेतलीय. पाहूयात भारताच्या शेजारील देशांमध्ये नेमकं काय सुरू आहे.

Saam Tv

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद आता पूर्णतः युद्धाच्या छायेत ओढला गेलाय. पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानविरोधात ओपन वॉरची घोषणा केलीय. पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानच्या लष्करी तळांना टार्गेट केलंय.. काबूल, पक्तिया आणि कंधार भागात हवाई हल्ले सुरू आहेत. काबुलमध्ये जवळपास 2 तास लढाऊ विमानांचा आवाज येत होता. त्याशिवाय जोरदार स्फोट, गोळीबारही झाला.

या हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशाराही अफगाणिस्तानच्या सरकारने दिलाय. अफगाणी सैन्यानेही पाकिस्तानच्या सीमेवरील चौक्यांना टार्गेट केलय. त्यानंतर काही तासांत पाकिस्ताननेही पलटवार केला. पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानच्या सैन्य मुख्यालयासह अनेक तळांवर हल्ले सुरू केले आहेत. या युद्धाबाबत पाकिस्तनचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियात काय पोस्ट केलीय पाहूयात

पाकचं ‘ऑपरेशन गजब लिल हक’

आमच्या संयमाची सीमा आता ओलांडली गेलीय. आता आमच्यात आणि तुमच्यात उघड युद्ध सुरू झालंय. अफगाणिस्तानातील टीटीपी या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हे स्ट्राईक करण्यात आले आहेत.

पाकिस्ताननं या मोहिमेला 'ऑपरेशन गजब लिल हक' असं नाव दिलंय. दुसरीकडे अफगाणी सैन्यानं पक्तिया, खोस्त, नंगरहार, कुनार आणि नूरिस्तानसारख्या भागात पाकिस्तानी हल्ल्याला उत्तर देत पाकच्या सैन्याला मागे ढकललंय. त्यांनी पाकिस्तानी एअरक्राफ्टही पाडले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी या संघर्षाबाबत चिंता व्यक्त केलीय. तर अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या बाजूनं उडी घेत पाकला इशारा दिलाय.

अफगाणिस्तानचे झेंडे लावून अमेरिकेची वाहनं युद्धभूमीकडे रवाना झाली आहेत. आधीच इराण-अमेरिका आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सुरू आहे. रशियाशी मैत्री करणाऱ्या देशांना रोखण्यासाठी अमेरिकेनं टॅरिफ वॉर सुरू केलंय. त्यात पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाचा भडका उडाला तर त्याचे परिणाम आशिया खंडातल्या व्यापारावर होतील आणि स्वाभाविकच त्याचा फटका भारतालाही बसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

Maharashtra News Live Update: लाखोंच्या अनुदान अपहारप्रकरणी महिला तलाठी जेरबंद

South Indian banana chips: चहासोबत काहीतरी मस्त हवंय? घरच्या घरी बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत बनाना चिप्स

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

Political News : दिल्लीत हालचालींना वेग! मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार, 'या' नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT