Kansas Firing News Saam TV
देश विदेश

Kansas Firing News: धक्कादायक! कॅन्सस शहरात अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू,२२ जण जखमी

Kansas Shooting : क्रीडा स्पर्धेदरम्यान सहभागी झालेल्या काही व्यक्तींनी संशयीतांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली. संबंधित संशयीत आरोपी नेमके कोण आहेत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Ruchika Jadhav

US Firing:

अमेरिकेतील कॅन्सस शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘सिटी चीफ्स सुपर बाउल’ या स्पर्धेच्या विजयाचा उत्सव सुरू असताना शहरात गोळीबार झाला आहे. गुरुवारी ही थरारक घटना घडली. या घटनेत आतापर्यंत २ जणांचा मृत्यू आणि २२ जण जखमी झाले आहेत.

खेळात विजय मिळवल्यावर एक परेड रॅली काढण्यात आली होती. या रॅलीवर अचानक अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच कॅन्सस शहराचे पोलीस प्रमुख स्टेसी ग्रेव्हज घटनास्थळी दाखल झाले.

माध्यमांशी बातचीत करताना त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेनंतर तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. क्रीडा स्पर्धेदरम्यान सहभागी झालेल्या काही व्यक्तींनी संशयीतांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली. संबंधित संशयीत आरोपी नेमके कोण आहेत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ग्रेव्हज यांनी यावर प्रतिक्रिया देत पुढे म्हटलं की,"येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. उपस्थित सर्व व्यक्तींना येथे सुरक्षित आणि चांगल्या वातावरणाची अपेक्षा होती. सदर गोळीबार का झाला? त्यामागील हेतू काय होता? याबाबत पोलीस अद्याप तपास करत आहेत.

डेन्व्हर शहरात एमबीए चॅम्पियनशिपमध्येही गेल्या वर्षी अशीच गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबारामुळे तेव्हाही बऱ्याच व्यक्ती जखमी झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या सबवे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरही गोळीबार झाला होता. या सर्व घटनांमुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT