US Attack On Iran Saam Tv
देश विदेश

US Attack On Iran: इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री, इराणच्या ३ अणुकेंद्रावर बॉम्ब हल्ला

America Attack on Iran: इराण इस्त्रायल हल्ल्यात आता अमेरिकेने एन्ट्री घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर हल्ले केले आहेत.

Siddhi Hande

इराण आणि इस्त्रायलचं (Iran Isarael War) युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच आता या युद्धात अमेरिकादेखील सहभागी झाली आहे. अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केला आहे. तीन आण्विक स्थळांवर हा हल्ला केला आहे. हा हल्ला यशस्वी झाला असल्याचे सांगितले जात आहे. जर हा हल्ला यशस्वी झाला असेल तर इराणचे खूप नुकसान झाले असेल.

अमेरिकेने इराणचे तीन आण्विक स्थळे फोर्डो, नतांज आणि इस्फहानवर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती पोस्ट करत दिली आहे.

ट्रम्प यांची माहिती (Donald Trump Give Information)

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सर्व अमेरिकेची विमाने ही इराणच्या हवाई सीमेबाहेर आली आहेत. ती सुरक्षित अमेरिकेत परतली आहेत. यातील सर्वाधिक बॉम्ब हे फोर्डो नावाच्या ठिकाणी टाकण्यात आले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या सैन्याचं कौतुकदेखील केलं आहे. आपण महान योद्ध्यांचं खूप अभिनंदन.जगातील कोणतेही सैन्य ही कामगिरी करु शकत नाही. आता शांतीची वेळ आली आहे.

या हल्ल्यानंतर इराणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इराणने या हल्ल्याबाबत अजूनही मौन व्रत ठेवले आहे.

गेल्या नऊ दिवसात ४०० हून अधिक इराणी नागरिकांचा मृत्यू

इराणच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या नऊ दिवसांत इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आणि ३,०५६ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये २,२०० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन; वाढत्या प्रदूषणास कारणीभूत व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी आंदोलन

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT