Iran Vs Israel : इराणचे हल्ले, इस्त्राईलचा संताप, इराणी अणू शास्त्रज्ञ 'मोसाद'च्या निशाण्यावर? शास्त्रज्ञांविरोधात 'मोसाद'चं 'ऑपरेशन नार्निया'

Iran Vs Israel News : मोसादने इराणविरोधात खतरनाक प्लॅन बनवलाय.... आता इराणचे टॉप कमांडर नाही तर थेट इराणचं कंबरडं मोडण्यासाठी ऑपरेशन नार्निया सुरु केलंय... इस्त्राईलचे ऑपरेशन नार्निया काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Iran Vs Israel
Iran Vs Israelx
Published On

मोसाद.... जगातली सगळ्यात खतरनाक गुप्तहेर संघटना....याच संघटनेच्या गुप्त माहितीच्या आधारे इस्त्राईलने इराणच्या टॉप कमांडरचा खात्मा केलाय....मात्र त्यापुर्वीच मोसादने हिट लिस्ट बनवून अणू शास्त्रज्ञांचा गेम फिनिश करण्यासाठी ऑपरेशन नार्निया राबवलंय... मात्र हे ऑपरेशन कसं राबवलं? पाहूयात....

ऑपरेशन रायजिंग लायनआधी मोसादचं ऑपरेशन नार्निया

- अणू शास्त्रज्ञांचं 4 स्तरात वर्गीकरण

- लष्कराशी संबंधित शास्त्रज्ञ टॉप टार्गेटवर

- शास्त्रज्ञांची माहिती गोळा करुन सैन्याला कमांड

- लक्ष्यभेदी हल्ले आणि शास्त्रज्ञांची झोपेतच हत्या

Iran Vs Israel
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना खूशखबर! लाडकीला मिळणार बिनव्याजी कर्ज?

याच ऑपरेशन नार्नियाच्या माध्यमातून फेरेयद्दून अब्बासी, मोह्मद महदी, अकबर मतलाली, सईद बेराजी, अमीर हसन यांच्यासह 9 अणू शास्त्रज्ञांचा खात्मा करण्यात आला...मोसादच्या या ऑपरेशननंतरच इस्त्राईलने थेट ऑपरेशन रायजिंग लायन राबवून इराणच्या अणू केंद्रांवर हल्ले करत युद्धाला तोंड फोडलं....मात्र आता इराणनेही मिलाईल हल्ले करुन इस्त्राईलला पळता भुई थोडी केलीय... त्यामुळेच मोसादने ऑपरेशन नार्निया पार्ट 2 अंतर्गत तब्बल 10 हजार मोसादचे कमांडो इराणमध्ये घुसवण्याची योजना आखलीय... त्यामुळे आकाशासोबतच इराणला अंतर्गंत संपवण्यासाठी शाल्डॅगची टोळी उतरल्यास फक्त अणुशास्त्रज्ञच नाही तर इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींनाही धोका आहे.. त्यामुळे मोसादने अचूक राबवलेलं ऑपरेशन नार्निया सगळ्याच अणू शास्त्रज्ञांना संपवण्यात यशस्वी होणार का? याचीच चर्चा रंगलीय....

Iran Vs Israel
Malshej Ghat : कारची बाईकला धडक, तरुणाचा जागीच अंत; माळशेज घाटात भीषण अपघात, संतप्त गावकरी अन् पोलिसांचा राडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com