Malshej Ghat : कारची बाईकला धडक, तरुणाचा जागीच अंत; माळशेज घाटात भीषण अपघात, संतप्त गावकरी अन् पोलिसांचा राडा

Malshej Ghat Accident : माळशेज घाटामध्ये भीषण अपघात झाला. फिरायला आलेल्या पर्यटकाच्या कारने स्थानिक तरुणाच्या दुचाकीला धडक मारली. या प्रकरणावरुन गावकरी आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला. परिणामी माळशेज घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली.
Malshej Ghat Accident
Malshej Ghat AccidentSaam Tv
Published On

फैयाज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Malshej Ghat Accident News : माळशेज घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माळशेज घाटामध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या कारने स्थानिक तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

वींकेड असल्याने अनेकजण फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत असतात. त्यातही पावसाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. माळशेज घाटामध्येही अनेकजण फिरण्यासाठी येतात. अशाच एका पर्यटकांच्या कारने मुरबाड तालुक्याच्या अवले गावातील तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

Malshej Ghat Accident
Ind Vs Eng : 3 प्रमुख फलंदाजांची शतकीय खेळी... तरीही टीम इंडियाने नोंदवला लज्जास्पद विक्रम

माळशेज घाटामध्ये झालेल्या भीषण अपघाताची माहिती अवले गावातील ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर गावातील गावकऱ्यांनी मुरबाड-माळशेज महामार्ग रोखून धरला. ज्या पर्यटकाच्या कारने दुचाकीला धडक मारली, त्या पर्यटकांना आमच्या स्वाधीन करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांना महामार्गावर गर्दी केली.

Malshej Ghat Accident
Airplane Accident : मोठा विमान अपघात टळला; पायलटनं दिला होता Mayday कॉल, कारण...

ज्या पर्यटकांना स्वाधीन करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावरुन अवले गावातील ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. संतप्त गावकऱ्यांनी मुरबाड-माळशेज महामार्ग रोखून धरल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Malshej Ghat Accident
Ind Vs Eng : ४४७ धावांपासून नजर लागली, एक-एकजण तंबूत परतला, अवघ्या २४ धावांमध्ये अर्धा संघ गारद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com