justice yashwant varma resignation  Saam Tv
देश विदेश

Yashwant Verma : हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा राजीनामा; अचानक नेमकं काय घडलं? माहिती आली समोर

Justice Yashwant Verma News : जळालेल्या नोटा प्रकरणात अडकलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे महाभियोग स्थगित होणार असून कायदेशीर वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा राजीनामा

  • जळालेल्या नोटा प्रकरणामुळे वाद

  • महाभियोग प्रक्रिया चर्चेत

  • कायदेशीर वर्तुळात खळबळ

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्त करण्यात आला आहे. २०२४ साली वर्मा यांच्या घरातून जळालेल्या नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी कोर्टात केस सुरु असताना त्यांच्या या निर्णयाने कायदेशीर वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

न्यायमूर्ती वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असताना १५ मार्च २०२४ रोजी त्यांच्या दिल्लीमधील घरात असणाऱ्या स्टोअर रूमला अचानक आग लागली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याच कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र ही आग विझवताना अग्निशामक दलाला मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटांचे बंडल सापडले. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा न्यायमूर्ती वर्मा भोपाळमध्ये होते.

या प्रकरणानंतर वर्मांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य पाहता गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या तब्बल १५२ खासदारांनी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर केला. लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली होती. न्यायमूर्ती वर्मा यांनी या समितीच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र १६ जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. तसेच आता वर्मांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने महाभियोग प्रक्रियेत आता कोणताही अडथळा उरणार नाही.

काय सांगतो कायदा?

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि त्यांना काढून टाकण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना आहे. सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार किंवा त्यांची कर्तव्ये पार पाडण्यास मानसिक किंवा शारीरिक असमर्थता असेल, तरच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढून टाकता येते. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशांना संसदेने महाभियोग प्रस्ताव मंजूर केल्यानंतरच पदावरून काढून टाकता येते. हा प्रस्ताव लोकसभेत मांडताना किमान १०० खासदारांच्या आणि राज्यसभेत मांडताना किमान ५० खासदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. एखाद्या न्यायमूर्तीला पदावरून हटवण्यासाठी संसदेत महाभियोग चालवून तो मंजूर करावा लागतो. मात्र, न्यायमूर्तींनी स्वतःहून राजीनामा दिल्यास ती प्रक्रिया तिथेच थांबते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

Congress Protest Live Update : आधी ज्ञानेश कुमार, नंतर मोदी-शाहंनाही हटवणार; राहुल गांधींचा थेट इशारा

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत संपवलं; नक्की काय घडलं?

Pooja Sawant: पूजा सावंतच्या सौंदर्याची भुरळ! पिवळ्या लेहेंग्यातील मनमोहक लूक पाहिलात का?

Railway Recruitment 2026 : रेल्वेत नोकरीची संधी; तब्बल ३५४८ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT