Ajit Pawar Saam Tv
देश विदेश

शरद पवार आणि मोदी भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीमध्ये भेट झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीमध्ये भेट झाली. आज दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास संसदेत पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये २० ते २५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमी या भेटीला विशेष महत्त्व दिला जात आहे. पवार आणि मोदींच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. अजित पवार म्हणाले की, "मी शिर्डी परिसरामध्ये आहे.

हे देखील पहा-

यामुळे जोपर्यंत माहिती घेत नाही, तोपर्यंत बोलणं उचित नाही, पण देशाचे पंतप्रधान आणि एका पक्षाचे राष्ट्रीय नेते विकासकामाविषयी भेटू शकतात. काही महत्त्वाचे प्रश्न असतात त्यात चर्चा करावी लागते, तसे काही प्रश्न असू शकतात. दोन्ही मोठे नेते आहेत. त्यांच्यात काय विषय झाला मला माहित नाही. दरम्यान दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची ही वन टू वन भेट होती. दोघांमध्येच २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीचा विषय आजून देखील नेमका समजू शकला नाही. पण राजकीय चर्चा झाली असणार यामध्ये काय शंका नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार (Narendra Modi and Sharad Pawar) या २ दिग्गज नेत्यांमध्ये आज, बुधवारी भेट झाली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. त्यांच्यामध्ये जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि काही नेत्यांवर झालेली ईडीची कारवाई या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीमुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपमध्ये (BJP) जोरदार संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. काल, मंगळवारीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay-Raut) यांच्याविरोधात ईडीने मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार आणि मोदी यांच्यात दिल्लीत भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, ही भेट नेमकी कोणत्या कारणाने झाली? कोणत्या मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

SCROLL FOR NEXT