"ईडी जिसकी मम्मी हैं वो सरकार निकम्मी हैं" प्रणिती शिंदेंनी दिला केंद्राविरुद्ध नारा

काँग्रेसच सोलापुरात महागाई विरोधात आंदोलन
Praniti Shinde
Praniti Shindeविश्वभुषण लिमये
Published On

सोलापूर: देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस (Congress) कडून देशभर आंदोलन केलं जातं आहे. आज सोलापुरात (Solapur) काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढ आणि देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाई (Inflation) विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी, 'ईडी जिसकी मम्मी हैं वो सरकार (Government) निकम्मी हैं' असा नारा प्रणिती शिंदेंनी यावेळी दिला आहे.

हे देखील पहा-

महागाई विरोधात काँग्रेसच हे सलग तिसरा आंदोलन सोलापुरात होत आहे. या आंदोलनात गॅस सिलेंडर (Cylinder) आणि मोटारसायकलींना पुष्पहार चढवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे."दरम्यान, मनसे (MNS) ही भाजपाची (BJP) 'सी टिम' आहे, तर चंद्रकांत दादा पाटलांनी कोल्हापुरातील (Kolhapur) मतदारांना ईडीची धमकी दाखवून सिद्ध केलंय की ईडी भाजपासाठी काम करते." अशी टीका प्रणिती शिंदेंनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि चंद्रकांत दादा पाटलांवर केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com