Airplane News  x
देश विदेश

Airplane Accident : मोठा विमान अपघात टळला; पायलटनं दिला होता Mayday कॉल, कारण...

Airplane News : गुवाहाटीवरुन चेन्नईला जाण्याासाठी निघालेले इंडिगोचे विमान बंगळुरूमध्ये उतरवण्यात आले. बंगळुरूमधील विमानतळावर या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. लँडिंगपूर्वी विमानातील पायलटने मेडेचा कॉल दिला होता.

Yash Shirke

अहमदाबाद विमान अपघातामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशीच भीषण विमान दुर्घटना टळली आहे. इंडिगोचे विमान गुवाहाटीहून चेन्नईला निघाले होते. पण विमानाचे बंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. पायलटने विमानात कमी इंधनामुळे मेडे मेसेज असा मेसेज पाठवला. सुदैवाने हे विमान बंगळुरूमधील विमानतळावर उतरवण्यात आले. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये विमान अपघातापूर्वीही मेडे मेसेज पाठवण्यात आला होता.

इंडिगो विमानाच्या आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर आणि मेडे मेसेज केल्यानंतर विमानाच्या पायलटला पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पायलट मेडे मेसेज पाठवतात. विमान हवेत असताना लँडिंग व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्यावर एटीसीला मेडे मेसेज पाठवून विमानाच्या आपत्कालीन परिस्थितीची जाणीव करुन द्यावी लागते.

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) तीन अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, एअर इंडियाच्या अंतर्गत व्यवस्थापनात खासकरून क्रू शेड्यूलिंग, नियमांचे पालन आणि जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या बाबतीत काही मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत. हे निर्णय १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या अपघाताशी संबंधित आहेत की नाही, हे डीजीसीएने स्पष्ट केलेले नाही.

नाव जाहीर केलेल्या तीन अधिकाऱ्यांना क्रू शेड्यूलिंगशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांमधून हटवावे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि १० दिवसांच्या आत या कारवाईचा अहवाल द्यावा, असा आदेश डीजीसीएने एअर इंडियाला दिला आहे. भविष्यातील उल्लंघनांमुळे परवाना निलंबन देखील होऊ शकते, असेही डीजीसीएने म्हटले आहे. एअर इंडियाने आदेशाची अंमलबजावणी करत 'रक्षितता नियम आणि मानक प्रक्रिया नीट पाळली जाईल, यासाठी एअर इंडिया पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT