Drone Attack Lahore X
देश विदेश

Big Breaking : एक से एक बढिया चाल; भारत लाहोरमध्ये घुसला, रडार यंत्रणा नेस्तनाभूत, ड्रोन हल्ल्यांनी पाकला हादरवलं

India Pakistan Airstrike: लाहोरमधील रडार निष्क्रिय: संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली की, लाहोर येथील हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करण्यात आली आहे. याशिवाय पाकिस्तानच्या अनेक ठिकाणांवरील हवाई संरक्षण यंत्रणांवरही हल्ले झाले.

Namdeo Kumbhar

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणाव वाढलाय. पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार हल्ले करण्यात येत आहेत. भारताकडूनही पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाते आहे. भारतासोबत तणाव अधिक तीव्र झाला असतानाच पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे.

संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की, ८ मे २०२५ रोजी पहाटे पाकिस्तानातील अनेक हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणांवर हल्ले करण्यात आले, यामध्ये लाहोर येथील एक हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय करण्यात आली. पाकिस्तानने लाहोर आणि इस्लामाबाद विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती बंद केली. तसेच, लाहोरमध्ये ८ मे रोजी सकाळी स्फोटांचा आवाज ऐकू आला, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी नोंदवले

आज झालेल्या ड्रोन हल्ल्यात हवाई संरक्षण यंत्रणेला मोठा धक्का बसलाय. चिनी एचक्यू-९ ड्रोन हल्ल्यात खराब झालेय. हा पाकिस्तानला सर्वात मोठा झटका मानला जातोय. चीनच्या एयर डिफेन्स सिस्टमचं नुकसान झाल्याचा रिपोर्ट खरा असेल तर पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का मानला जातोय. पाकिस्तान चीनचे एयर डिफेन्स सिस्टमचा वापर करतो, पाकिस्तानकडे ८० टक्के शस्त्रे ही चिनी डिफेन्सवर चालणारी आहेत.

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, चिनी बनावटीच्या HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणेला ड्रोन हल्ल्यांमध्ये गंभीर नुकसान झाले आहे. पाकिस्तान आपल्या 80 टक्क्यांहून अधिक शस्त्रास्त्रांसाठी चीनवर अवलंबून आहे. जर ड्रोन हल्ल्यामध्ये एचक्यू९ चे नुकसान झाले असेल तर सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जातोय.

रशियाच्या S-300 आणि अमेरिकेच्या पॅट्रियट यंत्रणेची तंत्रज्ञान चोरी करून HQ-9 ही यंत्रणा चीनने तयार केल्याचा दावा केला जातोय. चीनच्या या यंत्रणेची मारक क्षमता १२०-२५० किलोमीटर असल्याचे सांगितलेय. HQ-9A, HQ-9B आणि HQ-9BE असे प्रकार आहेत. ही यंत्रणा क्रूझ मिसाइल्स, विमाने आणि बॅलिस्टिक मिसाइल्स रोखू शकते, असा दावा चीनने केला आहे. या यंत्रणेत AESA रडार, मल्टी-ट्रॅकिंग आणि मल्टी-टारगेट हल्ल्याची क्षमता आहे. मात्र, ड्रोन हल्ल्यांमध्ये ही यंत्रणा पूर्णपणे निष्फळ ठरली. त्यामुळे चीनने केलेले दावे खोटो ठरले आहेत.

२०२१ पासून HQ-9B यंत्रणा पाकिस्तानने आपल्या हवाई संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी तैनात केली. यापूर्वीही अनेक अहवालांमध्ये चिनी यंत्रणेच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. तरीही चीनच्या दबावामुळे पाकिस्तानने ही यंत्रणा खरेदी केली. कराची, ग्वादर आणि इस्लामाबादसारख्या संवेदनशील ठिकाणी ही यंत्रणा तैनात केली. भारताच्या राफेल, ब्रह्मोस आणि Su-30MKI यांसारख्या शस्त्रास्त्रांचा सामना करण्यासाठी ही यंत्रणा घेण्यात आली होती. पण ड्रोन हल्ल्यांमध्ये ही यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याने पाकिस्तानला मोठा हादरा बसलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT