India Pakistan Tension : पाकिस्तानी घुसखोराला टिपलं, पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफची कारवाई

BSF Action in Punjab Firozpur: भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफ जवानांनी पाकिस्तानी घुसखोराला ठार केलं आहे. मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला असून ओळख अद्याप पटलेली नाही.
Indian Army
Indian ArmySaam tv
Published On

BSF shoots infiltrator, Indian border security news : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला असतानाच, पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी पाकिस्तानी घुसखोराला टिपलं आहे. फिरोजपूर सरकारी रुग्णालयातील इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ. मनप्रीत सिंग यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी एक मृतदेह रुग्णालयात आणला असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही, यासंबंधीचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने एक्सद्वारे दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील फिरोजपूरमध्ये ७ मे 2025 च्या मध्यरात्री एका पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने ठार केले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हा घुसखोर भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होता. सीमा सुरक्षा कुंपणाच्या दिशेने येत असल्याचे दिसले, त्यानंतर बीएसएफने फायरिंग केली.

सूत्रांनुसार, फिरोजपूर सेक्टरमध्ये सतर्क बीएसएफ जवानांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. पण त्याने ऐकले नाही, त्यामुळे जवानांनी गोळीबार केला. पहाटे त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, असे एएनआयने सांगितलेय.

Indian Army
India Vs Pakistan: आम्ही भारताची ५ लढाऊ विमाने पाडली, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा बोगस दावा, भारत प्रत्युत्तर देत म्हणाला...

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असतानाच ही घटना घडली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले करून उद्ध्वस्त केले. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्याने पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला होता, त्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Indian Army
India Pakistan tensions : एलओसीवर मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार, बिथरलेल्या पाकड्यांची नापक हरकत

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) पुंछ, राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे गोळीबार केला जात आहे. मागील ४८ तासात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू आणि ५९ जण जखमी झाले, त्यापैकी 44 पुंछमधील होते. त्यातच फिरोजपूरमधील आजच्या घुसखोरीच्या घटनेने सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. बीएसएफने सीमेवर सतर्कता वाढवली असून, कोणत्याही संशयास्पद हालचालींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com