India Pakistan tensions : एलओसीवर मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार, बिथरलेल्या पाकड्यांची नापक हरकत

Pakistan Fires at Civilians Along LoC : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एलओसीवर करनाह आणि उरी परिसरात गोळीबार करत नागरिकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात १५ नागरिक ठार, भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर.
Pahalgam Attack
India-Pakistan TensionsSaam tv
Published On

ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकड्यांच्या नापाक हरकती थांबायचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानी सैन्याने मध्यरात्री एलओसीवर गोळीबार करत नागरिकांना लक्ष्य केले. पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्री करनाह परिसरात जोरदार गोळीबारी आणि गोळ्यांचा मारा केला. या हल्ल्यात नागरिकांना निशाणा बनवण्यात आल्याने तणाव आणखी वाढला आहे.

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने एलओसीपासून ३० किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईने पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय. पाकिस्तानी सैन्याने पुंछ, राजौरी आणि उरी परिसरात गेल्या २४ तासांत सातत्याने गोळीबारी केला. यात १५ नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. भारतीय लष्करानेही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले.

Pahalgam Attack
Pakistan : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांना दुसरा हादरा, BLA चा IED हल्ला, १४ पाकिस्तानी सैनिकाच्या चिंधड्या, VIDEO आला समोर

भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला; शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानी सैन्याने मध्यरात्री करनाह, पुंछ, राजौरी आणि उरी परिसरात जोरदार गोळीबार आणि गोळ्यांचा मारा केला. या पार्श्वभूमीवर, सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांतील शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

Pahalgam Attack
IED Attack : पाकिस्तानी सैनिकांवर मोठा हल्ला, १० जणांचा जागीच मृत्यू

जम्मू विभागातील जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पुंछ, तसेच काश्मीरमधील बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ येथील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. पंजाबमधील फिरोजपूर, पठाणकोट, अमृतसर, फाजिल्का आणि गुरदासपूर जिल्ह्यांतही शाळा बंद आहेत, तर पठाणकोटमध्ये पुढील ७२ तास शाळा बंद राहतील. राजस्थानमधील गंगानगर, बीकानेर, जैसलमेर आणि बाडमेर या सीमावर्ती जिल्ह्यांतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सावधगिरीचा उपाय म्हणून सुट्टी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com