ChatGpt, OpenAI CEO Saam Digital
देश विदेश

ChatGpt, OpenAI CEO: ChatGPT चा निर्माता सॅम ऑल्टमनची CEO पदावरून हकालपट्टी, OpenAI ने का घेतला टोकाचा निर्णय?

ChatGpt, OpenAI CEO: जवळपास एक वर्षांपूर्वी चॅटजीपीटीचा अविष्कार केलेले ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांची पदावरून हकालपट्टी करून कंपनीने संपूर्ण जगाला धक्का दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ChatGpt, OpenAI CEO

जवळपास एक वर्षांपूर्वी ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी चॅटजीपीटीचा अविष्कार करून जगात खळबळ माजवली होती. मात्र , मायक्रोसॉफ्ट समर्पित फर्मचे नेतृत्व करण्यास ऑल्टमन सक्षम नसल्याचे कारण देत कंपनीने त्यांची हकालपट्टी करून संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

३८ वर्षीय सॅम ऑल्टमने अभूतपूर्व क्षमता आणि कृत्रिम बुद्धीमत्ता असलेल्या चॅटबॉटचा अविष्कार केला होता. एका सेकंदात कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यावर मिळत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवी क्रांती घडून आली होती. त्यामुळे या क्षेत्रातील मोठ्या मोठ्या कंपन्यांचेही धाबे दणाणले होते.

दरम्यान सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी केल्यानंतर ओपनएआय बोर्डाने एक निवेदन जारी करत यासंदर्भात खुलासा केला आहे. ऑल्टमन यांना बडतर्फ करण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेण्यात आला आहे. ऑल्टमन त्यांच्या कामाबाबत स्पष्ट नव्हते. यातून जबाबदारी पार पाडण्यात त्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे ओपनएआयचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर आता बोर्डाचा विश्वास राहिला नाही, असं निवेदनात म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साधारण एक वर्षापूर्वी ऑल्टमन यांनी चॅटबॉट अ‍ॅप लॉन्च केल्यानंतर जगावर जे परिणाम झाले, त्याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. सिमौरीमध्ये जन्मलेल्या आणि स्टॅनफोर्डचा विद्यार्थी राहिलेले ऑल्टमन यानंतर घराघरात पोहोचले होते. चॅटजीपीटीमुळे एआयचा काळ सुरू झाला आणि यात अ‍ॅमेझ़ॉन, मेटा, गूगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गज कंपन्यांनी मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मायक्रोसॉफ्टने तर ओपनएआयमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

दरम्यान अमेरिकन काँग्रेस समोर ऑल्टमन यांनी साक्ष दिली आहे आणि तंत्रज्ञानाबाबत राष्ट्राध्यक्षाशी चर्चा केली होती. ज्यामध्ये जैवशास्त्रात एआयचा संभाव्य वापर, चुकीची माहिती आणि इतर जोखमींविरूद्ध नियम करण्यासाठी दबाव वाढतो असं म्हटलं होतं.

दरम्यान ओपनएआयच्या स्थापनेसाठी आणि भरभराटीसाठी ऑल्टमन यांनी दिलेल्या योगदानाबाबत कृतज्ञ असल्यांचं निवेदनात कंपनीने म्हटलं आहे. तसेच सध्या कंपनीला पुढे जाण्यासाठी नव्या नेतृत्वाची गरज आहे, त्यामुळे कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा सुतारी यांच्या अंतिम सूचनेनुसार ऑल्टमन यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

SCROLL FOR NEXT