Women Safe Driving Report
Women Safe Driving ReportSaam Digital

Women Safe Driving Report: पुरुषांपेक्षा महिला ड्रायव्हरच बऱ्या, आकडेवारीतून शिक्कामोर्तब

Women Safe Driving Report: अलीकडच्या काळात रस्ते अपघाताची संख्या वाढली आहे. या अपघातांमध्ये दरवर्षी लाखो लोक जीव गमावतात. अशातच महिलांच्या ड्रायव्हिंगबाबत एक सकारात्मक बाब समोर आली आहे.
Published on

Women Safe Driving Report

अलीकडच्या काळात रस्ते अपघाताची संख्या वाढली आहे. या अपघातांमध्ये दरवर्षी लाखो लोक जीव गमावतात. अशातच महिलांच्या ड्रायव्हिंगबाबत एक सकारात्मक बाब समोर आली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला चालकांचे अपघात कमी होण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही कमी आहे, आंध्र प्रदेश रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भातील सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

आंध्र प्रदेश मंत्रालयाच्या अहवालानुसार, आंध्र प्रदेशमध्ये २०१९ ते २०२२ या काळात १४,२१७ चालकांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये केवळ ४६२ महिला चालक होत्या. एकूण मृत्यू झालेल्या चालकांपैकी हे प्रमाण चार टक्के आहे. मात्र २०१९ मध्ये ९७ महिला चालकांचा मृत्यू झाला होता. तर २०२२ मध्ये ५८ टक्के वाढ झाली असून १५४ अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे. लिंगगुणोत्तराच्या आधारावर योग्य डेटा नसला तरी राज्यातील रस्ते अपघातांमध्ये पुरुषांचा वाटा ९० टक्के आहेत तर महिलांचा १० टक्के आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विझाग शहरातील वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मते, महिला रस्त्यावर वाहन चालवताना अतिशय सावध असतात. त्या पुरुषांप्रमाणे कोणतीही जोखीम पत्करत नाहीत. तसंच ९० टक्के महिला वाहन चालवताना हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरतात.

Women Safe Driving Report
Nainital Road Accident: भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू

पुरुष आणि महिलांची वाहन चालवतानाची वर्तवणूक बऱ्याचअंशी रस्ते अपघाताच्या या परिस्थितीवर परिणाम करते. पुरुष वाहन चालवताना जास्त निष्काळजी असतात. अनेकदा वाहने भरधाव चालवतात तर कधी चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करतात ज्यातून अपघांतांच प्रमाण वाढतं. याऊलट महिला कमी वेगाने वाहने तर चालवतातच शिवाय वाहतुकीच्या नियमांच पालन करतात. समोरच्या वाहनाला काळजीपूर्वक ओव्हरटेक करतात. त्यामुळे त्यांची ड्रायव्हिंग सुरक्षित मानली जाते.

वास्तविक वाहन चालवणाऱ्या महिलांची संख्या कमी असली तरी पुरुष वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांच पालन करत नसल्याचं अहवालातून समोर आलं आहे. शिवाय मद्यपान करून वाहने चालवण्याचं प्रमाण देखील अधिक आहे.

Women Safe Driving Report
Digha Railway Station: नवी मुंबई मेट्रोप्रमाणे दिघा रेल्वे स्थानकही सुरु करा; ठाकरे गटाची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com