पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेकवरून चिंता व्यक्त केली असून भारतासमोरील सर्वात मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांचा अलीकडेच एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये मोदी गरबा खेळत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सदर व्हिडीओ खोटा ठरला आहे. खुद्द पंतप्रधानांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यावर भाष्य करताना चिंता व्यक्त केली आहे. नुकताच अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर अमिताभ बच्चन यांनी कारवाईची मागणी केली होती.
दिल्लीतील भाजपच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एआय आणि डीपफेकमुळे भारतासमोर मोठा धोका निर्माण झाला आहे. ज्यामुळे अराजकता माजू शकते. एआय अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आणि डीपफेक बाबत लोकांना शिक्षित केलं पाहिजे. माध्यमांनी याबाबत जागृती केली पाहिजे. माझा स्वत:चाच गरबा खेळतानाचा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटलं. शालेय जिवनानंतर कधी गरबा खेळल्याचं आठवत नाही. मात्र हा व्हिडीओ अशा पद्धतीने बनवला आहे की कोणालाही वाटाव की मी खरचं गरबा खेळत आहे. येणाऱ्या काळात हा एक धोका आपल्यासमोर असणार आहे. या गोष्टींविषयी जागृक झालं पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचे डीपफेक फोटो समोर आले होते. ज्यामध्ये सारा भारतीय क्रिकेटर शुभमन गिलसोबत दिसत आहे. वास्तविक त्या फोटोत सारा तिचा भाऊ अर्जुनसोबत उभी आहे. मात्र डीपफेक वापरून अर्जुनच्या जागी शुभमन गिलचा चेहरा लावण्यात आला होता. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.