Ahmedabad Plane Crash x
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : विमान खाली कोसळले अन् आग भडकली, विमान अपघातात कसा वाचला विश्वास कुमार रमेश? पाहा नवा थरारक व्हिडीओ

Air India Crash : अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान नागरी वस्तीत कोसळले. विमानात उपस्थित असलेल्या २४२ जणांपैकी फक्त एक प्रवासी वाचला. या प्रवाशाचा व्हिडीओ नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये २७० च्या पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. विमानातील २४२ जणांपैकी २४१ जण दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी अपघातात वाचले. विश्वास कुमार रमेश यांचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमान अपघातानंतरच्या स्फोटामुळे आग आणि धुर बाहेर पडत असताना विश्वास कुमार रमेश बाहेर पडत असताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या नव्या व्हिडीओमध्ये आगीच्या ज्वाला आणि काळा धूर बाहेर पडताना दिसत आहे. विश्वास कुमार देखील त्याच बाजूने पायी बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांच्या आसपास लोकांचा गोंधळ आहे. विश्वास कुमार यांच्या पाठीमागे विमानाच्या स्फोटामुळे आग आणि धूर बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळते.

विश्वास कुमार रमेश हे ब्रिटीश नागरिक होते. अहमदाबादहून ते लंडनला त्यांच्या भावांसह निघाले होते. अपघातामध्ये विश्वास कुमार यांच्या भावांचा दुर्दैवी अंत झाला. एअर इंडियाच्या विमानात ११ ए क्रमांकाच्या सीटवर विश्वास कुमार बसले होते. अपघातामुळे विश्वास कुमार जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची रुग्णालयात भेट घेतली होती.

एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ विमानाच्या इकॉनॉमी क्लासच्या ११ ए सीटवर विश्वास कुमार बसले होते. ही सीट आपत्कालीन एक्झिटजवळील खिडकीची सीट आहे. विमानातील फ्लाइट अटेंडंटसाठी बनवलेल्या जागेच्या जवळ ही सीट आहे. रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांनी अपघाताविषयी माहिती दिली होती. मी विमानात ज्या ठिकाणी बसलो होतो, तो भाग जमिनीवर पडला. माझ्याकडे कमी जागा होती. दार उघडून मी निघण्यासाठी जागा शोधू लागलो. मी जीवंत आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता, असे विश्वास कुमार रमेश यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

Latur Shocking : पुण्यानंतर लातूरमध्ये रक्तरंजित थरार; शेतात गाढ झोपलेल्या बाप-लेकाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकले

SCROLL FOR NEXT