Ahmedabad Air India Plane Crash Saam Tv News
देश विदेश

Air India Plane Crash: तू इंधन का बंद केले?, एअर इंडियाचे विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही पालटमध्ये काय बोलणं झालं होतं?

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद एअर इंडिया विमान कोसळल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. एका महिन्यानंतर एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अहवाल दिला आहे. यामधून धक्कादायक माहिती उघड झाली.

Priya More

अहदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला होता. या विमान अपघातामध्ये २७५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एअर इंडिया फ्लाइट १७१ च्या अपघाताबाबत एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने शनिवारी मध्यरात्रीनंतर आपला प्राथमिक अहवाल जारी केला. या अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली. या अहवालात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील (CVR) धक्कादायक संभाषणात उघड झाला आहे.

एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अहवालात नोंदवलेल्या कॉकपिट संभाषणानुसार, उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये अचानक इंधन पुरवठा खंडित झाला. त्यानंतर एका पायलटने दुसऱ्याला विचारले, 'तू इंधन का बंद केले?' दुसऱ्या पायलटने उत्तर दिले, 'मी बंद केले नाही.' महत्वाचे म्हणजे विमानाने उड्डाण करताच १८० नॉट्सचा कमाल वेग गाठला होता. त्याचवेळी दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच १ सेकंदाच्या फरकाने "RUN" वरून "CUTOFF" मध्ये बदलले. लगेचच इंजिन १ चा इंधन स्विच पुन्हा RUN मध्ये आणण्यात आला. इंजिन २ चा स्विच देखील RUN मध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झाले.

एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अहवालात असेही म्हटले आहे की, दोन्ही इंजिनमध्ये रीस्टार्ट प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु वेळेच्या कमतरतेमुळे आणि उंचीच्या अभावामुळे दोन्ही इंजिन पुन्हा सुरू करता आली नाहीत. तसंच, रॅम एअर टर्बाइनच्या तैनातीने आपत्कालीन स्थितीची पुष्टी केली. फ्लॅप हँडल योग्य 5-अंश टेकऑफ स्थितीत आढळले. लँडिंग गियर खाली स्थितीत होते. अपघात होईपर्यंत थ्रस्ट लीव्हर पुढे स्थितीत होते. हवामान अनुकूल होते, पक्षी धडकला नव्हता. विमानाचे वजन मानक मर्यादेत होते, असे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले

एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या या अहवालानंतर एअर इंडियाने एक निवेदन जारी केले. एअर इंडियाने सांगितले की, या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसह आणि सर्वांच्या पाठीशी आम्ही उभे आहेत. या अपूरणीय नुकसानाबद्दल आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो आणि या कठीण काळात मृतकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. १२ जुलै २०२५ रोजी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने जारी केलेल्या प्राथमिक अहवालाची आम्ही पुष्टी करतो आणि त्याचा आढावा घेत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT