
इंडोनेशियातील टांगेरंग शहरातील विमानतळावर एक मोठा अनर्थ टळला. विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे चाक धावपट्टीवरून घसरले. टांगेरंग येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्या पावसाचा तडाखा येथील विमानतळाच्या धावपट्टीला बसला. बतिक एअर कंपनीचे बोईंग ७३७ विमान अपघातग्रस्त होता होता राहिलं. टांगेरंग शहरातील सोएकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. विमानाचा धावपट्टीवर उतरत असतानाचा व्हिडीओही समोर आलाय.
शनिवारी झालेल्या खराब हवामानाचा फटका बतिक एअर कंपनीच्या विमानाला बसला. इंडोनेशियातील सोएकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना अनर्थ होत होता. विमानाचा लँडिंगचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडिओमध्ये विमानतळावर पाऊस होताना दिसतोय. दृश्यमानता कमी झाल्याचं दिसतंय.
विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानाची मागील चाके धावपट्टीवर लागताच. विमान हेलकावे खाताना दिसतंय. विमान एका बाजुला झुकलेलं दिसतंय. विमान इतके झुकते की त्याचे इंजिन जमिनीला लागेल अशी शक्यता होती. पण, पायलटने प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना होण्यापासून वाचवलं.
बतिक एअर कंपनीचे प्रवक्ते दणांग मंडाला प्रीहांतोरो यांनी याबाबत माहिती दिलीय. वादळी पावसात बोईंग ७३७ विमान धावपट्टीवर उतरत होते. त्यावेळी वेगाने वारे वाहत होते, त्या दाबामुळे विमान एका बाजूला ढकलले गेले. विमानाचे एक पंख धावपट्टीला लागले होते. या घटनेनेमुळे प्रवाशी घाबरले होते. पण वैमानिकांनी कठीण प्रसंगात धीर ढळू न देता सुरक्षितपणे उतरवलं. दरम्यान या घटनेनंतर बतिक एअर कंपनीचे अभियांत्रिकी पथक विमानतळावर दाखल झाले.
इंडिगोचे विमान गुवाहाटीहून चेन्नईला निघाले होतं. पण विमानाचे बंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. पायलटने विमानात कमी इंधनामुळे मेडे मेसेज असा मेसेज पाठवला. विमानाची आपातकालीन लँडिंग केल्यानंतर पायलटवर कारवाई करण्यात आलीय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.