Airplane Crash Saam
देश विदेश

Ahmedabad Air India: नागपूरहून शोकसभेसाठी निघाले, काळाने घाला घातला; ३ जणांचा विमान अपघातात मृत्यू

Ahmedabad Air India Plane Crash: लंडनमध्ये होणाऱ्या शोकसभेला जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबातील तिघांचा अहमदाबादमधील एअर इंडिया विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

नागपूरच्या क्वेटा कॉलनीतील रहिवासी असलेल्या कुटुंबावर दु:खाचं आभाळ कोसळलं. लंडनमध्ये होणाऱ्या शोकसभेला जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबातील तिघांचा अहमदाबादमधील एअर इंडिया विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागपूर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये यशा कामदार-मोढा, तिचा तीन वर्षांचा मुलगा रुद्र मोढा आणि सासू रक्षा मोढा यांचा समावेश आहे.

नागपूरमधून लंडनला शोकसभेला जात असताना अहमदाबादमधील विमान अपघातात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला. नागपूरच्या क्वेटा कॉलनीतील रहिवासी मनीष नेमचंद कामदार यांची मुलगी यशा कामदार - मोढा हिच्या सासऱ्यांचा महिनाभरापूर्वी कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू अहमदाबादमध्ये झाला होता. लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबाने शोकसभेचं आयोजन केलं होतं. या शोकसभेला कुटुंब निघालं होतं. पण काळानं झडप घातली आणि विमान अपघातात त्यांचा मृ्त्यू झाला.

अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्यामुळे त्यांच्याकडे काही कागदपत्रे कमी होते. लंडनला जाण्यासाठी त्यांना ती कागदपत्रे हवी होती. विमान कंपनीने त्यांना प्रवासाची परवानगी नाकारली होती. यशाचे पती त्यांना घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले . पंरतु यशाच्या सासूने समजूत घातल्यामुळे त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली.

यशाचा नवरा काही दिवसानंतर लंडनला जाणार होता. व्यवसायाकडे लक्ष देत असल्याचं सांगत तो पुन्हा आपल्या घरी माघारी परतला. मात्र, त्यानंतर काळाने झडप घातली. विमान अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. जर विमान कंपनी आपल्या अटी, शर्तींवर कायम राहिली असती, तर त्या तिघांचेही प्राण वाचले असते. मात्र, या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला.

ब्लॅक बॉक्स सापडला

अहमदाबाद येथील विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यात १० क्रू मेंबर्स, २ पायलट यांचाही समावेश आहे. या अपघातात एका प्रवाशाचे प्राण वाचले आहे. तसेच अपघातस्थळावरून २ ब्लॅक बॉक्स सापडले आहेत. या ब्लॅक बॉक्समध्ये अपघात नेमका घडला कशामुळे याची माहिती लवकरच समोर येईल. या अपघातानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT