Pyari Didi Yojana Saam Tv
देश विदेश

Pyari Didi Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी ताई...; महिलांना दरमहिना मिळणार 2500 रुपये, कशी असेल ही योजना?

Pyari Didi Yojana: दिल्लीच्या आगामी निवडणुका लवकरच होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी आपले जाहिरनामे प्रसिद्ध केले आहेत. काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात महिलांसाठी नवीन योजना राबवणार असल्याची घोषणा केली आहे.

Siddhi Hande

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात प्यारी दीदी योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये मिळणार आहे. काँग्रेस जर दिल्ली विधानसभा निवडणुक जिंकली तर राज्यातील महिलांना पैसे दिले जाणार आहेत. (pyari didi yojana)

दिल्लीच्या विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्ष जाहिरनामा जाहीर करत आहे. यामध्ये निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षात काय कामे करणार, याबाबत माहिती दिलेली असते. आज काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहेत. त्यात महिलांसाठी खास योजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस सरकार निवडून आल्यानंतर प्यारी दीदी योजना राबवणार आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जाणार आहे.(pyari didi yojana By Congress)

याआधीही आप पक्षाने महिलांसाठी खास योजना राबवणार असल्याचे आश्वासन दिले होते. दिल्ली सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजना राबवणार असल्याचे सांगितले आहे. या योजनेत महिलांना १००० रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, आप पक्षाच्या जाहिरनाम्यानंतर आता काँग्रेसनेही महिलांना २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)

महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश सरकारनेदेखील महिलांसाठी योजना राबवली आहे. आता दिल्लीतदेखील महिलांसाठी खास योजना सुरु करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

SCROLL FOR NEXT