Afghanistan Attack  x
देश विदेश

Afghanistan Attack : वाद पेटला! अफगाणिस्तानवर मोठा हल्ला, २०० तालिबानी तरुणांचा मृत्यू

Pakistan Afghanistan Clash : पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. यादरम्यान पाकिस्तानने २०० तालिबानी तरुणांना मारल्याचा दावा केला आहे.

Yash Shirke

  • पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष पेटला

  • २०० तालिबानी तरुण मारल्याचा दावा

  • पाकिस्तान सैन्याकडून निवेदन जाहीर

Afghanistan Pakistan Clash : पाकिस्ताान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये संघर्ष सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या संघर्षामुळे दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. २०० हून अधिक अफगाण तालिबानी तरुणांना मारल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. यादरम्यान २३ पाकिस्तानी सैनिकही मारले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानने ५८ पाकिस्तानी सैनिक मारले आणि २५ पाकिस्तानी लष्करी ठाणी ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे.

अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी हल्ल्याची माहिती दिली. 'शनिवारी (११ ऑगस्ट) रात्री बारा वाजता सौदी अरेबिया आणि कतारने हस्तक्षेप केल्यानंतर पाकिस्तानविरुद्धची कारवाई थांबवण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच बेकायदेशीर कारवाया थांबवण्यात आल्या आहेत, असे मुजाहिद यांनी म्हटले.

अफगाणिस्तानच्या सैन्याने २५ पाकिस्तानी लष्करी ठाणी ताब्यात घेतल्या आहेत असे मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आठवड्याच्या सुरुवातीला अफगाण अधिकाऱ्यांनी पाकिस्तानवर काबूल आणि देशाच्या पूर्व भागातील बाजारपेठेत बॉम्बस्फोट केल्याचा आरोप केला होता. मात्र, पाकिस्तानने हे आरोप नाकारले आहेत. दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु असताना पाकिस्तानने लष्कराने २०० हून अधिक अफगाणी तालिबानी तरुण मारल्याचे निवेदन जारी केले आहे.

सध्या अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी 'अफगाणिस्तानला शांतता हवी आहे', असे वक्तव्य केले. 'चर्चा, संवाद यांच्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. आम्ही अफगाणिस्तानमध्ये शांतता आणली आहे. आम्ही संपूर्ण प्रदेशात शांततेसाठी प्रयत्नशील आहोत. आम्हाला परिस्थितीचा शांततापूर्ण तोडगा हवा आहे, पण शांततेने प्रश्न सुटत नसतील, तर आमच्याकडे इतर पर्यायही आहेत,' असे मुत्ताकी यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा होणार; १८ विधेयके मांडली जाणार, लाडकी बहीण योजनेवरही फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Bigg Boss 19: 'सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नको...'; प्रसिद्ध अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून धमकी

Bigg Boss 19 Grand Finale : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस १९'चा स्ट्राँग स्पर्धक घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? ऑफिस वेळेनंतर नो कॉल-नो ईमेल

स्मृती-पलाशचं लग्न अखेर मोडलं, पुढे जाण्याची वेळ आली आहे

SCROLL FOR NEXT