Blast  संग्रहित छायाचित्र
देश विदेश

Afghanistan Blast: काबूलमध्ये मिनी बसमध्ये भीषण स्फोट, ७ जणांचा मृत्यू

Afghanistan Blast : या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही, परंतु इस्लामिक स्टेट गटाशी संबंधित संघटनांनी केला असल्याची शंका आहे.

Bharat Jadhav

Afghanistan Blast:

अफगाणिस्तानची राजधनी काबूलमध्ये शिया जमातीचे लोक असलेल्या भागात एक मिनी बसमध्ये स्फोट झाला. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झालाय तर २० जण जखमी झाले आहेत. काबुल शहराच्या पश्चिमेकडील दश्ती बर्ची भागात हा स्फोट झाल्याची माहिती पोलीस प्रवक्ते खालिद झदरन यांनी ही माहिती दिली. याविषयीचे वृत्त इंडिया टीव्हीने दिले आहे. (Latest News)

स्फोटाचे कारण अद्याप समजले नसून पोलिसांनी तपास सुरू केलाय. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही, परंतु इस्लामिक स्टेट गटाशी संबंधित संघटनांनी यापूर्वी या भागातील शिया समाजाच्या शाळा, रुग्णालये आणि मशिदींना लक्ष्य केलंय, असं झदरन म्हणाले. दरम्यान घटनास्थळी लष्कर दाखल झाले असून त्या परिसराची तपासणी करत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काबूलच्या दश्त-ए-बर्ची भागात नागरी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये हा स्फोट झाला, दुर्दैवाने आमचे ७ नागरीक मृत पावलेत आणि २० जण जखमी झाले, असल्याची पोस्ट खालिद झदरन यांनी सोशल मीडिया साइटवर केलीय. दरम्यान ऑक्टोबर महिन्यातही याच भागात स्फोट झाला होता. त्यावेळी स्पोर्ट्स क्लबमध्ये स्फोट झाला होता.

या हल्लाची जबाबदारी इस्लामिक स्टेट या संघटनेने घेतली होती. त्या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला होता आणि ७ जखमी झाले होते. ऑगस्ट २०२१ मध्ये यूएस-समर्थित सरकारची हकालपट्टी करून सत्ता काबीज केल्यानंतर तालिबानने त्यांचे बंड संपवले तेव्हापासून बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ल्यांच्या संख्येत लक्षणीय घट झालीय. दरम्यान अजून असे काही दहशतवादी संघटना आणि गट आहेत जे अजूनही तालिबानसाठी धोका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT