Chhattisgarh Naxal Attack
Chhattisgarh Naxal AttackSaam Tv

Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान नक्षलवाद्यांनी केला गोळीबार, तीन जवान जखमी

Chhattisgarh Election: छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान नक्षलवाद्यांनी केला गोळीबार, तीन जवान जखमी
Published on

Chhattisgarh Assembly Elections :

छत्तीसगडमधील सुकमा येथे निवडणूक कर्तव्यावर तैनात निमलष्करी जावन आणि नक्षलवादी नक्षलवाद्यांमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. यात तीन जवान जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. ताडमेटला आणि डुलेड गावांदरम्यानच्या जंगल भागात हा गोळीबार झाला आहे.

हा गोळीबार सुमारे 20 मिनिटे चालले, असे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रापासून सुमारे 200 मीटर अंतरावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या डीआरजी जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. मतदान केंद्र क्रमांक 195 दुरमा हे 3 किमी अंतरावर असलेल्या बांदा येथे हलवण्यात आले आहे. दुरमा येथे 284 मतदार आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत 20 जणांनी मतदान केले होते. सकाळी 11.15 वाजता नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये 10 मिनिटे गोळीबार झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhattisgarh Naxal Attack
Maratha Reservation Protest : बीडमध्ये तोडफोड, हिंसाचार करणाऱ्या 160 जणांना अटक, आरोपींकडूनच नुकसानीची भरपाई केली जाणार

या घटनेवर मुख्यमंत्री भूपेश बघेल काय म्हणाले?

या घटनेबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, पूर्वी मोठ्या घटना घडायच्या, आता किरकोळ घटना घडत आहेत. भविष्यात हे देखील बंद होईल, असे मला वाटते. गेल्या 5 वर्षात आम्ही केलेल्या कामामुळे नक्षलवाद मोठ्या प्रमाणात मागे पडला आहे. त्यामुळे गावोगावी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. लोक त्यांच्या गावातच मतदान करतील. नक्षलग्रस्त भागात मतदानाची टक्केवारी जास्त असण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

दुपारी 1 वाजेपर्यंत 44.55 टक्के मतदान

दरम्यान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मंगळवारी दुपारी 1 वाजेपर्यंत 44.55 टक्के मतदारांनी 20 जागांवर मतदानाचा हक्क बजावला आहे. सुकमा जिल्ह्यात शांततेत मतदानासाठी गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) कमांडो जखमी झाला.

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा असून पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान होत आहे. नक्षलग्रस्त समजले जाणारे हे क्षेत्र आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबरला होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com