थलपती विजय यांचा ‘ज्युनिअर MGR’ म्हणून उदय
चित्रपटातून राजकारणात दमदार प्रवेश
लोकप्रियतेचा राजकारणात प्रभावी वापर
तामिळनाडूच्या राजकारणात आज एका नव्या युगाचा उदय झालाय. दोन दशक रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयानं आणि अॅक्शननं करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे विजय थलपती यांनी आता राजकीय रणांगणातही 'ब्लॉकबस्टर' यश मिळवलयं. त्यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत दमदार कामगिरी करत प्रस्थापित राजकीय समीकरणांना सुरुंग लावल्यानं त्यांनी ज्युनिअर एमजीआर होण्याचा मान मिळवलाय.
ज्या पद्धतीने एम.जी. रामचंद्रन (MGR) यांनी एकेकाळी तामिळ राजकारणाची दिशा बदलली होती, तसाच काहीसा चमत्कार विजय यांनी करून दाखवलाय.अभिनय क्षेत्रातून एक्झिट घेत विजय थलपती यांनीही एमजीआर यांच्यासारखाचं राजकारणात आपला कसा जम बसवला पाहूयात. अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांनी 1953 साली DMK पक्षात प्रवेश केला आणि राजकारणाला सुरुवात केली.
डीएमके पक्षाचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एमजीआर यांनी आपल्या चित्रपटांचा प्रभावी वापर केला. पक्षाचा झेंडा, चिन्हे आणि विचारसरणी ते पडद्यावर दाखवू लागले. त्यानंतर 1967 मध्ये ते पहिल्यांदा मद्रास विधानसभेवर निवडून आले. मात्र पक्षातील भ्रष्टाचारावर प्रश्न विचारल्यामुळे 1972 मध्ये त्यांना डीएमकेमधून काढण्यात आले. त्याच वर्षी एआयएडीएमकेची स्थापना करून 1977 च्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी 130 जागांवर विजय मिळवून मुख्यमंत्रीपदही मिळवलं.
दुसरीकडे एमजीआर- जयललिता प्रमाणेच विजय थलपतींच्या विजयानंतर त्रिशा कृष्णनची चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीय.त्रिशा आणि विजय ही जोडी त्यांच्या अनेक चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच त्रिशाच्या वाढदिवसालाच विजय थलपती यांच्या दणदणीत विजयामुळे थलपतींनी आणखी एका गोष्टीची पुनरावृत्ती केल्याचं बोललं जातयं.
एम.जी. रामचंद्रन आणि जयललिता ही जोडी सुद्धा दक्षिणात्य चित्रपटात प्रसिद्ध होती. त्याचप्रमाणे त्रिशा आणि विजय यांची मैत्री सर्वश्रुत आहे. जयललिता यांना राजकारणात आणण्याचं पूर्ण श्रेय एमजीआर य़ांना जातं.एमजीआर यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षाची धुरा जयललिता यांनी मोठ्या ताकदीनं सांभाळली.
दरम्यान विजय थलपतीच्या विजयानंतर त्यांच्या भेटीसाठी त्रिशा सर्वात पहिल्यांदा उपस्थित राहिली. त्यामुळे एमजीआर- जयललिता यांच्या मैत्रीप्रमाणेच त्रिशा आणि विजय यांच्या मैत्रीची चर्चा राजकारणातही होऊ लागलीय.
त्यामुळे त्रिशा ही विजय थलपतींच्या राजकीय प्रवासात जयललितांसारखी एखादी भूमिका बजावणार का? जयललितांप्रमाणे त्रिशाला राजकारणात आणून विजय थलपती एमजीआर प्रमाणेच राजकीय वाटचाल करणार का?याची चर्चा आता रंगलीय.दरम्यान ज्याप्रमाणे एमजीआर यांनी आपल्या लोकप्रियतेचा वापर अत्यंत खुबीने राजकारणात केला, त्याच वाटेवर विजय थलपती चालताना दिसताय. त्यामुळे ज्युनिअर एमजीआर ही तामिळनाडूच्या राजकारणातील नवीन नांदी असेल हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.