जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

Land Dispute Turns Ugly in Pune: पुण्यातील इंदापूरमध्ये पोटच्या मुलांनी आई-वडिलांना भर रस्त्यावर जबर मारहाण केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीये. नेमका कशामुळे हा वाद झालाय? निर्लज्ज मुलांनी आपल्याच जन्मदात्यांना का मारलं?... नेमकं प्रकरण काय आहे?...
Pune Indapur sons assault elderly parents over land dispute
Pune Indapur sons assault elderly parents over land disputesaam tv
Published On

पुण्याच्या इंदापूरमध्ये एक अत्यंत संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आलीये. ज्या आई-वडिलांनी लहानाचं मोठं केलं, त्यांनाच पोटच्या गोळ्यानं भररस्त्यात काठीनं बेदम मारहाण केलीये. 65 वर्षीय तुकाराम किसन राऊत यांना अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला असून महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळलीये. इंदापूर शहरात घडलेला हा संतापजनक प्रकार नेमका काय आहे?...

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले

तुकाराम राऊतांनी वारसा हक्कातील जमिनीचा वाटा मुलांना दिला

मुलांनी आपल्या हिस्स्याची जमीन विकून टाकली

दोघेही मुलं आई-वडिलांपासून विभक्त राहतात

स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी आई-वडिलांनी आपली जमीन विकली

आई-वडिलांच्या जमिनीवरही डोळा असलेल्या मुलांकडून मारहाण

अमानुष मारहाण केल्याप्रकरणी वडिलांनी संजय राऊत आणि राजेंद्र राऊत या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, मालमत्तेच्या हव्यासापोटी मुलं आणि आई-वडिलांमधील वादाचा हा काही पहिलाच प्रकार नाहीये. याआधीही मन सुन्न करणारे अनेक प्रकार समोर आलेत. त्यामुळे न्यायालयालाही अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. मात्र, रक्ताच्या नात्यात जेव्हा संपत्तीचा विषय येतो, तेव्हा माणुसकी कशी हरवते, याचं इंदापूरमधील घटना जिवंत उदाहरण आहे. पोटच्या गोळ्याला हाताच्या फोडासारखं जपणाऱ्या आई-वडिलांना त्यांच्या उतारवयात संपत्तीसाठी अमानुष मारहाण करणाऱ्यांना कायद्यानं अद्दल घडवणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com