Himachal Pradesh Accident Saam TV
देश विदेश

Himachal Pradesh Accident : देवदर्शनाहून परतताना अपघात; आजी आणि नातीसह तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

Accident News : चंबा येथील राजपूर गावातील कुटुंब आणि नातेवाईक दावत महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

हिमाचल प्रदेशमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात आजी आणि नातीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. श्रावणानिमितात भगवान शंकराचं दर्शन घेऊन येत असताना हा अपघात झाला.

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटून हा अपघात झाला. घटनास्थळी झालेल्या मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तेथे पोहोचले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर जखमींना चंबा येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, चंबा येथील मणी-सिधाकुंड रस्त्यावर वाहनाचा अपघात झाला. कारमध्ये एकूण 11 जण होते. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. घटनेनंतर पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय चंबा रुग्णालयात आणले. (Accident News)

आठ जखमींमध्ये चार मुले, तीन महिला आणि चालकाचा समावेश आहे. चालकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 हजार आणि जखमींना प्रत्येकी 5 हजार रुपयांची तत्काळ मदत दिली आहे.

चंबा येथील राजपूर गावातील कुटुंब आणि नातेवाईक दावत महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना वळणावर वाहन रस्त्यावर उलटले. यात तिघांचा मृत्यू झाला, तर जखमींवर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला सोनं खरेदी का करतात? आयुष्यात होतो 'हा' मोठा बदल

March End: मार्च संपण्याआधी ही कागदपत्रे जमा कराच, अन्यथा पगारातून होतील पैसे कट; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार;7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Gold Rate Today: गुढीपाडव्या आधी सोन्याने उच्चांक गाठला, सोनं १२००० रुपयांनी महागलं; वाचा आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर

Urine Infection Home Remedies: युरिन इन्फेक्शनचा त्रास होतोय? हे 5 घरगुती उपाय करा

SCROLL FOR NEXT