Gujrat News : मुलीचा आंतरजातीय विवाह, कुटुंबियांनी उचलंल टोकाचं पाऊल, वडिलांसह भावाचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आई-वडील आणि दोन भावांनी विष प्राशन केले आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv

Ahmedabad News :

गुजरातच्या अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे नाराज असलेल्या कुटुंबियांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन करून कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आई-वडील आणि दोन भावांनी विष प्राशन केले आहे. या घटनेत मुलीचे वडील आणि एका भावाचा मृत्यू झाला आहे.

मुलीने वर्षभरापूर्वी दलित समाजातील व्यक्तीशी प्रेमविवाह केला होता. यातून नैराश्येतून वडील किरण राठोड (52), आई नीताबेन (50) आणि मुले हर्ष (24) आणि हर्षिल (19) यांनी मंगळवारी रात्री विष प्राशन केले. सध्या मुलीची आई आणि लहान मुलगा रुग्णालयात दाखल आहेत.

Crime News
Tamil Nadu Accident: सुसाट कार थेट ट्रकमध्ये घुसली.. एकाच कुटूंबातील ६ जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तातडीने अॅम्बुलन्स बोलावून सर्वांना खाजगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मुलीच्या वडिलांना आणि मोठ्या मुलाला मृत घोषित केले. महिला आणि तिच्या लहान मुलावर तेथे उपचार सुरू आहेत.

Crime News
Mumbai Crime News : टॅक्सी चालकाने राष्ट्रवादीच्या आमदाराला धमकावलं, टॅक्सीतूनही खाली उतरवलं; नेमकं काय घडलं?

पोलिसांना मुलीचा पती, सासरे, इतर नातेवाईक आणि मित्रांसह १८ जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त करणे, धमकी या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. FIRनुसार, राठोड आणि त्यांच्या कुटुंबियांनी नाराज होऊन आपल्या मुलीशी संबंध तोडले आणि तिच्या सासरच्या घरी जाण्यास नकार दिला होता. मात्र ही समस्या सोडवण्यासाठी मुलीच्या सासरच्या लोकांनी आणि इतर आरोपींनी त्यांचा मानसिक छळ केला. जे सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com