Mumbai Crime News : टॅक्सी चालकाने राष्ट्रवादीच्या आमदाराला धमकावलं, टॅक्सीतूनही खाली उतरवलं; नेमकं काय घडलं?

Mumbai Police : राजू कोरमोरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Wakola Police Station
Wakola Police StationSaam TV

Mumbai News :

मुंबईत टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातील वाद सर्रास पाहायला मिळतात. मात्र मुंबईत एका आमदाराला टॅक्सी चालकाच्या मुजोरीचा सामना करावा लागला आहे. मुजोर टॅक्सीचालकाने वादानंतर आमदार महोदयांना धमकावत टॅक्सीतून उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मतदारसंघातील आमदार राजू कोरमोरे यांना मुंबईत हा अनुभव आला आहे. एका टॅक्सी चालकाने त्यांना धमकावल्याची घटना समोर आली आहे. कोरमोरे हे टॅक्सीने वाकोला जंक्शन सांताक्रूझ येथून आमदार निवास कुलाबा येथे जाण्यासाठी निघाले होते. (Crime News)

Wakola Police Station
Pune Crime News : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा घरात घुसून विनयभंग, खडकी परिसरातील संतापजनक प्रकार

यावेळी टोलचे पैसे देण्यावरून वाद झाल्याने टॅक्सी चालकाने आमदार राजू कोरमोरे यांना धमकावत टॅक्सीतून उतरवले. या प्रकरणी कोरमोरे यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

Wakola Police Station
Pune Crime: जीवे मारण्याची धमकी, व्यावसायिकाकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी; पॅरोलवरील सराईताची पुन्हा जेलमध्ये रवानगी

राजू कोरमोरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात ५०६ (२), भादंवीसह १७८(३) मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com