Women Safety Tips: महिलांनो, घराबाहेर पडताना बॅगेत ठेवा या ७ महत्त्वाच्या गोष्टी; संकटाच्या वेळी येतील उपयोगी!

Shruti Vilas Kadam

मोबाईल नेहमी चार्ज ठेवा

घरातून बाहेर पडताना मोबाईल पूर्ण चार्ज करून घ्या. कुटुंबातील सदस्यांचे नंबर सेव्ह ठेवा. फोनमध्ये इमर्जन्सी SOS आणि लोकेशन शेअरिंग सुरू ठेवा. अडचण आल्यास यामुळे लगेच मदत मागता येईल.

WOMEN TRAVEL SAFETY TIPS: 10 THINGS WOMEN SHOULD NEVER CARRY WHILE TRAVELLING | Google

बॅगेत सेफ्टी अलार्म ठेवा

महिलांनी आपल्या बॅगेत छोटा सेफ्टी अलार्म ठेवावा. काही धोका जाणवल्यास तो वाजवता येतो. त्याच्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधले जाते आणि मदत मिळू शकते.

WOMEN TRAVEL SAFETY TIPS: 10 THINGS WOMEN SHOULD NEVER CARRY WHILE TRAVELLING | Google

छोटी टॉर्च सोबत ठेवा

रात्री बाहेर जाताना छोटी टॉर्च उपयोगी पडते. अंधाऱ्या रस्त्यावर चालताना, पार्किंगमध्ये किंवा काही वस्तू शोधताना तिचा वापर करता येतो. त्यामुळे मोबाईलची बॅटरीही वाचते.

WOMEN TRAVEL SAFETY TIPS: 10 THINGS WOMEN SHOULD NEVER CARRY WHILE TRAVELLING | Google

पेपर स्प्रे जवळ ठेवा

स्वतःच्या बचावासाठी महिलांनी बॅगेत पेपर स्प्रे ठेवू शकता. अचानक धोका निर्माण झाल्यास तो उपयोगी पडू शकतो. मात्र, त्याचा वापर कसा करायचा, हे आधी समजून घ्या आणि संबंधित नियमांची माहिती घ्या.

Women Safety Tips | Google

इमर्जन्सी कार्ड ठेवा

बॅगेत एक छोटे कार्ड ठेवा. त्यावर तुमचे नाव, घरातील व्यक्तींचे फोन नंबर आणि महत्त्वाची वैद्यकीय माहिती लिहा. मोबाईल हरवला किंवा बंद पडला, तर हे कार्ड मदतीला येऊ शकते.

Women Safety Tips | Google

हेल्पलाइन नंबर सेव्ह करून ठेवा

अडचणीच्या वेळी मदत मिळण्यासाठी महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. भारतातील आपत्कालीन मदतीसाठी ११२ आणि महिला हेल्पलाइनसाठी १८१ या क्रमांकांचा उपयोग करता येतो.

Women

प्रवास करताना सावध राहा

कॅब किंवा रिक्षाने प्रवास करताना गाडीचा नंबर तपासा. तो घरातील व्यक्तींना पाठवा. प्रवासादरम्यान आपले लाईव्ह लोकेशन शेअर करा. शक्यतो गर्दीच्या रस्त्याने प्रवास करा.

Avoid shortcuts | yandex

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही.

Women Safety Tips | GOOGLE

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Moong vs Chana Sprouts | Saam Tv
येथे क्लिक करा