Shruti Vilas Kadam
जिऱ्याचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचा फ्रेश आणि स्वच्छ वाटू शकते.
कॉटन पॅडने जिऱ्याचे पाणी हलकेच लावल्याने त्वचेवर ओलावा जाणवू शकतो.
जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात, जे त्वचेला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात.
चेहऱ्यावर साचलेली धूळ आणि घाम हलक्या हाताने पुसण्यासाठी याचा वापर करता येतो.
जिऱ्याचे पाणी त्वचेसाठी चांगला पर्याय आहे. पण, संवेदनशील त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा खाज आल्यास याचा वापर थांबवा.
१ कप पाण्यात १ चमचा जिरे उकळून ते पूर्ण थंड करा आणि गाळून घ्या. स्वच्छ कॉटन पॅड त्यात भिजवून अतिरिक्त पाणी हलकेच पिळून घ्या.
स्वच्छ चेहऱ्यावर कॉटन पॅड हलक्या हाताने फिरवा. डोळ्यांचा भाग टाळा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. आधी छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे चांगले.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.