Abhinav Arora  saam tv
देश विदेश

Abhinav Arora : अभिनव अरोरा किती आहे कृष्ण भक्त? झालं लाईव्ह टेस्ट, उत्तर ऐकून चकीत व्हाल

Abhinav Arora News : अभिनव अरोरा किती कृष्ण भक्त आहे,याचं लाईव्ह टेस्ट झालं. त्याची उत्तरे ऐकूण चकीत व्हाल.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : कंटेट क्रिएटर अभिनव अरोराचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांना जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य ओरडताना दिसत आहेत. यामुळे अभिनव अरोरा चर्चेत आले आहेत. जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांचा तो व्हिडिओ जुना असल्याची माहिती मिळत आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या अभिनवला अलीकडेच काही प्रश्न विचारण्यात आले. एक प्रश्न होता की, कृष्णाचा अर्थ काय? तर अभिनव म्हणाला, काला, श्याम. अभिनवने या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलंय. तर दुसरा प्रश्न होता की, कृष्ण कोणत्या भाषेतील शब्द आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनव फिरवून बोलू लागला. मात्र,त्याने उत्तर दिलं नाही. तर तिसरा प्रश्न होता की, भगवान कृष्णाचं पूर्ण नाव काय? अभिनव म्हणाला, 'भगवान कृष्णाचं नाव कृष्ण आहे. मात्र, खरं उत्तर आहे, श्रीकृष्ण वासूदेव. १० वर्षांच्या अभिनवने फक्त एकाच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं. कृष्णाच्या वडिलांचं नाव अभिनवने बरोबर सांगितलं.

कोण आहे अभिनव अरोरा?

सोशल मीडियावर अभिनव अरोराचा मोठा चाहता वर्ग आहे. युट्यूबवर त्याचे १.४७ लाख फॉलोवर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ९.५ लाख आणि फेसबुकवर २.२९ लाख फॉलो करतात. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनव अरोराला भारताचा सर्वात युवा अध्यात्मिक वक्ता असल्याचं सांगितलं आहे.

अभिनवचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला ट्रोल करू लागले आहेत. अभिनवला लॉरेन्स गँगने जिवे मारण्याची धमकी दिल्याचं वृत्त आहे. अभिनव दिल्लीतील खासगी शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे. अभिनव सध्या अध्यात्मिक शिक्षण घेत आहे. त्याचं कुटुंब कृष्णा नगरमध्ये राहतंय. अभिनवला धमकी मिळाल्यानंतर त्याचं कुटुंब दहशतीत आहे. लॉरेन्स गँगने त्याला धमकी दिल्यानंतर त्याची आई चिंतेत सापडली आहे. धमकीमुळे त्याला शाळेतही जाता येत नाहीये. त्याचे वडील लेखक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

SCROLL FOR NEXT